यशराज, प्रतीक व सविता यांनी पटकाविले विजेतेपद.यशराज, प्रतीक व सविता यांनी पटकाविले विजेतेपद.

यशराज, प्रतीक व सविता यांनी पटकाविले विजेतेपद.

धाराशिव कासार मॅरेथॉन : जिल्हा भरातुन प्रतिसाद

उस्मानाबाद प्रतिनिधी : अखिल भारतीय सोमंवशीय क्षत्रीय कासार समाजोन्नती मध्यवर्ती मंडळ उस्मानाबाद जिल्हा शाखेच्या वतीने घेन्यात आलेल्या धाराशिव कासार मॅरेथॉन स्पर्धेत बालगटातुन यशराज यादगिरे, पुरुष गटातुन प्रतिक जंगमे यांनी तर महीला गटातुन विजेतेपद पटकाविले आहे. उस्मानाबाद येथील तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलावर घेन्यात आलेल्या या मॅरेथॉनचे उद्घाटन मध्यवर्ती मंडळांचे संचालक अरुण यादगिरे व मराठवाडा उपाध्यक्ष गुलचंद व्यवहारे यांच्या हस्ते करन्यात आले. यावेळी मध्यवर्ती मंडळ जिल्हाध्यक्ष श्राजकुमार जगधने, सचिव प्रविण गडदे, जिल्हा युवकअध्यक्ष महावीर कंदले, महिला जिल्हाध्यक्षा स्नेहलता अंदुरे आदिंची प्रमुख उपस्थितीत होती.

यशराज, प्रतीक व सविता यांनी पटकाविले विजेतेपद.

स्पर्धेचा अंतिम निकाल अनुक्रमे प्रथम, द्वितीय व त्रुतीय प्रमाने बाल गटात यशराज अरुण यादगिरे, संस्कृती कपाळे, संस्कार कपाळे तर उत्तेजनार्थ क्रमांक अवधूत अंदुरे याने मिळविला, महिला गटात सविता कपाळे, ज्योती शिलवंत, हेमा अंदुरे, तर उत्तेजनार्थ क्रमांक दिपाली यादगिरे यांनी मिळविला. तर पुरुष गटात प्रतीक जंगमे, सचिन कपाळे, संतोष सातपुते, व उत्तेजनार्थ क्रमांक विशाल कासार यांनी मिळविला आहे. विजेत्या खेळाडुंसह कराटे खेळाडू यशराज अरुण यादगिरे, पाण्याच्या दाबावर चालणारे उपकरण हा विज्ञान प्रयोग सादर केलेला समर्थ महाविर कासार आणि पूर्ण ज्ञानेश्वरी स्वहस्ताक्षरात लिहून पूर्ण केलेले हरिदास कोळपे यांचा गौरव यावेळी करन्यात आला. यावेळी ‘जय कालिका’या दिनदर्शिकेचे वितरण करण्यात आले, या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अंजली जगधने, राजमती जगधने, अनिता कोळपे, मिनाक्षी सातपुते, दिपाली कासार, श्रद्धा जगधने, सविता कपाळे, विजयकुमार पारे, सचिन कपाळे, प्रसाद जगधने, आदित्य जगधने, संतोष सातपुते, शार्दूल कासार, अजय शिलवंत, सचिन कोकीळ, सुजित झरकर, प्रतीक जंगमे आदिंची परीश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!