लातूर येथील चलवाड नगरात कबड्डी स्पर्धा संपन्न.
लातूर दि 30 जाने जनविकास बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्थेच्या उद्घाटन प्रसंगी प्रभाग क्रमांक येथील चलवाड नगरात भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचे उद्घाटन संत गोरोबा सोसायटी चेअरमन तथा काँग्रेस प्रभाग 03 चे अध्यक्ष श्री विकास कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले
यावेळी संस्थेचे अध्यक्ष बालाजी सकट काँग्रेस पक्षाचे प्रभाग क्र. 7 चे नगरसेवक श्री. सचिन मस्के अँड. राजेंद्र लोंढे. श्री. अजय आडगळे. राष्ट्रवादी जिल्हा संघटक श्री योगेश उपाडे विश्वंभर सूर्यवंशी तसेच पंच श्री.लक्ष्मण बेल्लाळे, श्री. ज्ञानोबा लहाने, श्री. लालबा कावळे, श्री. व्यंकट बोबडे, श्री. विष्णु वाघमारे , श्री. प्रदीप मुसांडे संस्था संचालक शैलेश पवार, गणेश कांबळे, अविनाश सगट,नागेश कांबळे, शिवलिंग गव्हाणे, गणेश गायकवाड, धीरज हणमंते, सावन शिंदे उपस्थित होते तर स्पर्धेचे बक्षीस वितरण पवन कांबळे, नंदकुमार शिंदे, रवि.मस्के, राहुल, विश्वंभर सुर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले