राज्यस्तरीय ज्युनीयर तायक्वांडो स्पर्धेत रायगडला घवघवीत यश.
पनवेल प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल जळगाव येथे २६ ते २८ जानेवारी २०२३ रोजी सुरु असलेल्या अधिकृत राज्यस्तरीय ज्युनीयर व सिनियर तायक्वांडो पुमसे स्पर्धेत रायगड संघाला पहिल्याच दिवशी ७ सुवर्ण, ४ रौप्य व ४ कास्य पदके मिळवून घवघवीत असे यश संपादन केले आहे, संघटनेचे अध्यक्ष सदानंद निंबरे व सचिव सुभाष पाटील, तसेच खजीनदार प्रभाकर भोईर यांनी सर्व पदक विजेत्यांचे कौतुक केले.
पुमसे प्रकार ज्युनियर मुले ग्रुप मानस असोले कास्य पदक, अभिषेक चव्हाणकास्य पदक, ओमकार जोडे कास्य पदक, पुमसे प्रकार ज्युनियर मुली वैयक्तिक अनन्या चितळे सुवर्ण पदक, पुमसे प्रकार सिनीयर मुली ४० वर्षाखालील वैयक्तिक मुग्धा भोसले सुवर्ण पदक पुमसे प्रकार सिनीयर जोडी ३० वर्षावरील, प्रशांत घरत सुवर्ण पदक, मुग्धा भोसले सुवर्ण पदक पुमसे प्रकार सिनीयर ग्रुप ३० वर्षावरील, प्रशांत घरत रौप्य पदक, मच्चींद्र मुंढे रौप्य पदक राकेश जाधव रौप्य पदक, ग्रुप अनन्या चितळे सुवर्ण पदक , गायत्री भंडारे, सुवर्ण पदक रतिका अहुजा सुवर्ण पदक, पुमसे प्रकार सिनीयर मुले ४० वर्षाखालील वैयक्तिक प्रशांत घरत सुवर्ण पदक, पुमसे प्रकार सिनीयर मुले ५० वर्षाखालील वैयक्तिक राकेश जाधव रौप्य पदक, पुमसे प्रकार सिनीयर मुली ३० वर्षाखालील वैयक्तिक सेजल कानेकर कास्य पदक
या स्पर्धेतील सर्व जुनियर सुवर्णपदक विजेते खेळाडू ३ ते ५ फेब्रुवारी २०२३ रोजी स्वर्णभारती इंडोर स्टेडीयम विशाखापटनम आंध्रप्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय ज्युनीवर तायक्वांडो स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील, तसेच या स्पर्धेतील सर्व सिनीयर सुवर्णपदक विजेते खेळाडू १० ते १२ फेब्रुवारी २०२३ रोजी राजीव गांधी इंडोर स्टेडीयम पोन्डेचारी येथे होणाऱ्या राष्ट्रीय सिनीयर तायक्वांडो स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील. या सर्व विजेत्या खेळाडूंवर सर्व रायगड व नवी मुंबईतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ज्युनियर संघ प्रशिक्षक पुनीत पाटील, संघ व्यवस्थापक सुनील म्हात्रे सिनीयर संघ प्रशिक्षक प्रभाकर भोईर, संघ व्यवस्थापक सदानंद निबरे