पत्रकार शशिकांत वारिशेंच्या मारेकर्‍यांना तात्काळ अटक करा.पत्रकार शशिकांत वारिशेंच्या मारेकर्‍यांना तात्काळ अटक करा.

पत्रकार शशिकांत वारिशेंच्या मारेकर्‍यांना तात्काळ अटक करा.

लातुरात काळ्या फिती बांधून पत्रकारांची निदर्शने, जिल्हाधिकार्‍यांना दिले निवेदन

लातूर – रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांची निर्घृण हत्येची चौकशी करून आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी. तसेच मराठवाड्यातील केज, बीड आणि नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथील पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पत्रकारांवरील जिवेघेणे हल्ले आणि खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रकार वाढले असून राज्य सरकारने याची दखल घेवून पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी आणि पत्रकारांची मुस्कटदाबी थांबवावी. या मागणीसाठी आज १० फेब्रुवारी रोजी दुपारी लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने काळ्या फिती बांधून निदर्शने केली आणि जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांना निवेदन सादर केले.

या निदर्शने आंदोलनात पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष नरसिंह घोणे, सचिव सचिन मिटकरी, संगमेश्‍वर जनगावे, रघुनाथ बनसोडे, संजय गोरे, लिंबराज पनाळकर, विष्णू आष्टेकर, शिवाजी कांबळे, नेताजी जाधव, रवि बिजलवाड, संतोष सोनवणे, राम शिंदे, त्र्यंबक कुंभार, सुधाकर फुले, वाल्मिक केंद्रे, वैभव गिरकर, शंकर स्वामी, संजय स्वामी, दिगांबर तारे, मुरलीधरर चेंगटे, किशोर फुलकर्ते, मासुम खान, लहु शिंदे, अमोल इंगळे, दत्ता परळकर यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येने सहभागी झाले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!