कलोपासक मंडळाचे बालनाट्य महोत्सव १२ फेब्रुवारी ला

लातूरकरांसाठी दगडोजीराव देशमुख सभागृहात नाट्य पर्वणी.

मा महापौर श्री विक्रांत गोडमगुंडे यांच्या हस्ते नटराज पूजन.

लातूर दि ११ फेब्रुवारी पुढील पिढीवर नाट्य संस्कार व्हावेत, त्यांना नाटक म्हणजे काय हे कळावे आणि शहरात बालनाट्य चळवळ वाढावी या उद्देशाने कलोपासक मंडळ, लातूर यांनी बालनाट्य महोत्सव २०२२-२३ चे आयोजन रविवार दिनांक १२ फेब्रुवारी २०२३ दगडोजीराव देशमुख सभागृह येथे केले आहे. ३ सत्रात चालणाऱ्या या महोत्सवात शहरातील केशवराज विद्यालय, गोदावरीदेवी लाहोटी कन्या विद्यालय, जनकल्याण निवासी विद्यालय, राजानारायणलाल लाहोटी इंग्लीश विद्यालय, श्री श्री रवीशंकर विद्यालय, सरस्वती विद्यालय, संवेदना सेरेबरल पाल्सी विकसन केंद्र, ज्ञानप्रकाश बालविकास केंद्र, ज्ञानेश्वर विद्यालय अशा नऊ मान्यवर शाळांचे संघ सहभागी होत आहेत. यात दर्जेदार नाटकांचा समावेश असून सुमारे १२५ बालकलाकार आपली नाट्य कला लातूरकरांसमोर सादर करणार आहेत. पहिले सत्र ९.३० ते १२.३० दुसरे सत्र १.०० ते ४.०० तिसरे सत्र ४.३० ते ७.३० प्रत्येक सत्रात ३ शाळांची नाटके सादर होतील.

या महोत्सवाच्या निमित्ताने विविध शाळेतील विद्यार्थ्यांना बालनाट्यासाठी एकत्रित रंगमंच उपलब्ध करून देण्याचे कार्य कलोपासक मंडळाची आयोजन समिती अपर्णा गोवंडे, नाट्यकर्मी सुधन्वा पत्की, अमोल गोवंडे हे करत आहेत. यातून शालेय विश्वात बालनाट्याची संस्कृती रुजून शहरातील सर्वच शाळांत बालनाट्य सादरीकरण पुन्हा सुरू होईल अशी आशा माजी महापौर श्री विक्रांत गोजमगुंडे यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी या महोत्सवाला लातूर शहरातील नागरिक, विविध शाळांचे विद्यार्थी, पालक, शिक्षक, संस्थाचालक यांनी आपल्या परिवारासह उपस्थिती नोंदवून बालनाट्य स्पर्धेचा आनंद घ्यावा असे आवाहनही केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!