श्री केशवराज प्राथमिक विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन संपन्न.
लातूर प्रतिनिधी : श्री केशवराज प्राथमिक विद्यालयात दिनांक 28 फेब्रुवारी ला राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त डॉ. सी. व्ही. रमण व योगी अरविंद घोष यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी मंचावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष विभाग प्रमुख श्री लक्ष्मीकांत कुलकर्णी व प्रमुख वक्ते म्हणून श्री मुरलीधर गवळी सर हे उपस्थित होते. प्रमुख वक्ते श्री गवळी सर यांनी राष्ट्रीय विज्ञान दिन का साजरा केला जातो व विज्ञान म्हणजे काय याबद्दलची अगदी सोपी व छोटी उदाहरणे विद्यार्थ्यांना देऊन विज्ञानाचे महत्त्व सांगितले. विज्ञानाचा चांगला उपयोग केला की ते आपल्यासाठी वरदान आहे पण त्या वैज्ञानिक शोधाचा जर वाईट उपयोग झाला तर तेच विज्ञान शाप सुद्धा ठरू शकते. त्यासाठी विज्ञानामुळे लावलेल्या शोधांचा आपण समाजासाठी चांगला उपयोग करून घेतला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. यानंतर अध्यक्ष अध्यक्षीय समारोप करताना श्री लक्ष्मीकांत कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांमधूनच उद्याचे वैज्ञानिक निर्माण होणार आहेत व तुम्हाला विचार करण्याची सवय लागली पाहिजे. तसेच आपल्या मनामध्ये नेहमी वेगवेगळ्या गोष्टींविषयी प्रश्न निर्माण झाले पाहिजेत तरच आपण काहीतरी शोध लावू शकतो असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार कार्यक्रम प्रमुख सौ.सूर्यवंशी बाई यांनी मानले.