श्री पुरणमल लाहोटी शाळेत ग्रंथ दिंडीने मराठी भाषा दिन साजरा.
लातूर प्रतिनिधी: श्री पुरणमल लाहोटी पाठशाळेत मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला. या निमित्य भव्य ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. हि दिंडी शाळेतून शहरातील गांधी चौक, हनुमान चौक मार्गे सुभाष चौक, येथून परत शाळेत आली. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.श्री. संजयजी बियाणी, शालेय समिती अध्यक्ष तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून सौ सुनीता कुलकर्णी सेवा निवृत्त मुख्याध्यापिका या उपस्थित होत्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सौ. शैलजा कारंडे याही उपस्थित होत्या. मान्यवरांच्या हस्ते कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले होते.

याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री राजाराम काथवटे, शिक्षक प्रतिनिधी सौ अर्चना कुलकर्णी, ज्येष्ठ शिक्षक श्री सरपाळे, शाळेतील सर्व शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी काव्यवाचन भारुड अभंग, कविता, पोवाडा, यांचे गायन व वाचन यावेळी केरुन मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला.