डाॅ महादेव गव्हाणे यांची सिनेट निवडीबद्दल शिवसेनाकडुन सत्कार.
लातूर दि ०३ मार्च शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने साहेब यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीमान डॉ. महादेव गव्हाणे सर यांची स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे सिनेट सदस्य पदावर नियुक्ती झाल्याबद्दल फेटा, शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विष्णू साबदे उपजिल्हाप्रमुख, रमेश माळी शहरप्रमुख, सुनील बसपुरे शहरप्रमुख, बाबुराव शेळके तालुकाप्रमुख, ॲड नारायण माने, राज लाटे सहसमन्वयक, तानाजी करपुरे कामगार सेना जिल्हा संघटक, माधव कलमुकले विधानसभा संघटक, युवराज वंजारे विधानसभा समन्वयक, निलेश शिंदे आदी उपस्थित होते.