शिक्षक सम्रध्दि यांच्या वतिने राष्ट्रीय स्पर्धेतील उपविजेता सय्यद इद्रिसचा सत्कार
लातूर प्रतिनिधी : आसाम राज्यातील गुवाहाटी येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय थायबॉक्सिंग स्पर्धेत सय्यद इद्रीस मोहम्मद यांने सिल्व्हर मेडल प्राप्त केले आहे. या बद्दल शिक्षक सम्रध्दि परिवाराच्या वतिने या खेळाडुचा बाॅक्सींग किट देवून त्यांचा सत्कार करण्यात आला आहे. शिक्षक सम्रध्दि परिवाराचे अध्यक्ष इस्माईल शेख उपाध्यक्ष मतिन अब्बासी व सचिव अशफाक शेख यांनी त्याचा सत्कार केला असुन सय्यद इद्रिस याने अंतिम सामन्यात अत्यंत अटीतटीच्या लढती मध्ये यांचा निसटता पराभव झाला. नऊ वर्ष गटातील राष्ट्रीय थायबॉक्सिंग स्पर्धेत याने आपला सहभाग नोंदवला होति. यावेळी सय्यद माेहम्मद सर, मुल्ला सय्यद, सय्यद अनिस, सय्यद सर व त्यांचे प्रशिक्षक उपस्थित होते.