अंजनगाव खेलोबाच्या प्रियांकाची सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदी निवड.
माढा प्रतिनिधी : माढा तालुक्यामधील अंजनगाव खेलोबा येथील स्व.पैलवान लक्ष्मण गडेकर यांची कन्या प्रियांका गडेकर हिने अत्यंत कठीण परिस्थितीत हे यश मिळविले आहे. वडिलांचे निधन झाल्यावर खचून न जाता लहान बंधू किरण याने मोठ्या जिद्दीने व विश्वासाने प्रियांका हिला माध्यमिक शिक्षण श्री खिलोबा विद्यालय अंजनगाव खेलोबा, उच्च माध्यमिक शिक्षण विज्ञान शाखेत कै.शंकरराव बाजीराव पाटील विद्यालय अनगर येथे पूर्ण केले , त्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअर हे पदवी अभ्यासक्रम पुणे येथे पूर्ण केले. हे करत असताना परिस्थिती अत्यंत गरिबीची व बेताची असल्यामुळे 3 वर्ष आपण केलेल्या शिक्षणाच्या जोरावर इंजिनिअरिंग क्षेत्रात नौकरी केली , पण लहान पणीच अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिल्यामुळे पुन्हा 2019 पासून राज्यसेवा परीक्षेची तयारी सुरू केली आणि हे यश संपादन केले. 2020 रोजी AMVI RTO ही परिक्षा दिली व पहिल्या प्रयत्नांमध्ये clear देखील केली त्यात कोरोना चे मोठे संकट आले त्यामुळे मुख्य परीक्षा पुढे गेल्या , आलेल्या परिस्थितीला तोंड देत जोमाने अभ्यास सुरू ठेवला आणि उत्तुंग भरारी घेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महिलांमध्ये 13 वी रँक मिळविली आहे. हे यश संपादन केल्याबद्दल माढा तालुक्याचे आमदार श्री बबनदादा शिंदे साहेब तसेच करमाळा तालुक्याचे आमदार श्री संजय मामा शिंदे उस्मानाबाद क्रीडा अधिकारी श्री कैलास लटके, वनपाल श्री बाबासाहेब लटके, प्रा.दत्तात्रय देवकते सर कृषी सहाय्यक श्री सुहास गडेकर तसेच सर्व गडेकर परिवार व अंजनगाव ग्रामस्थ यांनी अभिनंदन करून भरभरून कौतुक केले व शुभेच्छा दिल्या आहेत.