केशवराज प्राथमिक शाळेत स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथी साजरी.
लातूर दि २६ फेब्रुवारी श्री केशवराज प्राथमिक विद्यालयात आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त लातूर नेता न्युज चे संपादक श्री नेताजी जाधव व शाळेचे मुख्याध्यापक श्री शिवाजी हेंडगे यांच्या हस्ते सावरकरांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक श्री हेंडगे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयीचे विचार व्यक्त करताना असे सांगितले की, स्वातंत्र्यवीर सावरकर हे स्वातंत्र्यासाठी झटणारे थोर समाजसुधारक, विज्ञानवादी व थोर क्रांतिकारक होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांना जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतर ‘ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण’ ही कविता त्यांनी लिहिली. लोकांच्या मनामध्ये त्यांनी स्वदेशी विषयीची जाणीव निर्माण केली तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनातील काही प्रेरक प्रसंग यानिमित्ताने सांगितले. यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.