गुढीपाडवा, मराठी भाषा वाढवा; सार्वजनिक गुढी समितीचा संदेश.
लातूर दि २३ मार्च मराठवाड्यातील अनोख्या सार्वजनिक गुढी महोत्सव लातूर शहरात साजरा केला जातो. सन 1998 पासून या गुढी महोत्सवाला सामाजिक गुढी समितीच्या वतिने सुरुवात करण्यात आली. प्रतिवर्षी सामाजिक संदेश देत नवं वर्षाचे स्वागत करत राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेले तिरंगी गुढी उभारण्यात येते यंदाच्या वर्षी सार्वजनिक गुढी महोत्सव समितीच्या वतीने “गुढीपाडवा, मराठी भाषा वाढवा” हा सामाजिक संदेश देत साजरा करण्यात आला. समितीच्या वतीने काल दि 22 रोजी सकाळी पारंपरिक वाद्याच्या सुरात गोलाईतील श्री जगदंबा मंदिर परिसरात पारंपरिक पद्धतीने सजविण्यात आलेल्या गुढीची तिरंगी फेटे परिधान करून मिरवणूक काढण्यात आली गोलाईला प्रदीक्षणा पूर्ण झाल्यानंतर श्री जगदंबा मंदिरा समोर गुढीची उभारणी करून कार्यक्रमाचे अध्यक्ष बसवंतअप्पा भरडे, समितीचे अध्यक्ष गणेश फुले, बालाजी कल्लेकर, चंदु बगडे, प्रमुख पाहुणे चंद्रकांत बिराजदार ,यांच्या हस्ते विधिवत पूजन करुन या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
सामाजिक संदेशासह – गुढी पाडवा, मराठी भाषा वाढवा; गुढीपाडवा मराठी शाळा वाचवा, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या, माझे मराठीचे बोलू कौतुके परी अमृताचे पैज जिके, गर्व आहे मराठी असल्याचा, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, फलक लावण्यात आले होते. या सालातील गुढी पाडवा समितीच्या पुरस्काराचे मानकरी हे शहरातील जी सी बी औद्योगिक क्षेत्रात भारतात प्रथम लातूर शहरात विहीर खोदण्या करिता 70 फूट पोकलेन बनवणारे युवा उद्योजक सय्यद सलीम नवाब शहरातील श्रीमंत गणेश मंडळ व धाडस युवा मंडळ संस्थापक संतोष पांचाळ व ॲड प्रदीपसिह गंगणे यांना प्रमुख पाहुण्याच्या हस्ते पुष्पहार व गुढीचा हार, स्मृती चिन्ह, देऊन गौरविण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष बसवंतप्पा भरडे, प्रमुख पाहुणे म्हणून लातूर शहर महानगरपालिका उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, माजी अध्यक्ष माजी नगरसेविका स्वाती घोरपडे, अँड निलेश करमुडी, संस्थापक अध्यक्ष दीपक गंगणे, यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष दीपक गंगणे यांनी केले तर सूत्रसंचालन गिरीश तुळजापुरे यांनी केले. आभार डॉ संजय जमदाडे यांनी मानले. या वेळी राजकुमार जोशी, बाबासाहेब बनसोडे, सी झोन क्षत्रीय अधिकारी प्रवीण सुरवसे, शंकर जाधव, प्रवीण कनमुकले, राज धनगर, रामभाऊ जवळगे, रेणुका बोरा, कावेरी विभूते, डॉ बालाजी रणक्षेत्रे, अर्णव गंगणे, श्री येरटे, सुश्मिता बोरा, कृष्णा राठोडे, हणमंत गोत्राळा, लोकरे प्रसाद इत्यादीं उपस्थित होते.
