स्केटिंग राष्ट्रीय खेळाडू आस्था नाईकर चा राज्य सेमिनारात सत्कार .
कल्याण प्रतिनिधी : कल्याण येथील स्केटिंग राष्ट्रीय खेळाडू आस्था प्रकाश नाईकर हिने नुकताच राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी बजावत नुकतेच सुवर्ण पदक पटकावले आहे. या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्राच्या वतीने पुणे येथे स्केटिंगच्या राष्ट्रीय सेमिनार मध्ये आस्थाचा राज्य स्केटिंगचे अध्यक्ष पी के सिंग यांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. लोक कल्याण पब्लिक स्कूल, कल्याण येते ७ वीत शिकणाच्या आस्था ने स्केटिंग या खेळामध्ये राज्य, राष्ट्रीय स्पर्धेमध्ये अनेक पथकासह महाराष्ट्राला विजेतेपद मिळवून दिलेला आहे तसेच रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या तिसऱ्या रँकींग राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेमध्ये ५००० मीटर एलिमीनेशन रोड रेस मध्ये महाराष्ट्राला 1 सुवर्ण व 1 रौप्य पदक मिळवून दिलेले आहे अशी कामगिरी करणारी ठाणे जिल्हातील पहिली खेळाडू होण्याचा मान ही आस्था ने पटकावला. आस्थाने आत्तापर्यंत 3 वेळा महाराष्ट्र शासन युवक संचालनालय आयोजित घेण्यात आलेल्या राज्य स्पर्धेमध्ये के. डी. एम. सी चे प्रतिनिधित्व केले आहे. मोहाली चंदीगड, रायपुर प्रत्तीसगड, जोधपुर येथील राष्ट्रीय स्पर्धा ही तिने गाजवल्या तर बेल्जीयम येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी ही तिची निवड करण्यात आली आहे. आस्था चे प्रशिक्षक पवन ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत असून आगामी बेल्जियम येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पातळीवर ही भारताला पदक मिळवून देण्याची महत्त्वाकांक्षा आस्था ची आहे. आई सुप्रिया नाईकर यांनी बोलताना सांगितले की कल्याण तालुक्यामध्ये स्केटिंग ट्रॅक नसल्यामुळे आस्थाच्या सरावासाठी तिला पुणे मुंबई खोपोली येथे नेहमीच घेऊन जावे लागते. शाळा आणि सराव या दोघांची सांगड घालत तिने हे यश संपादन केले आहे. जर कल्याण डोंबिवली मध्येच स्केटिंग ट्रॅक झाला तर आपल्याकडील अनेक खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चमक दाखवतील असे सांगितले. पुणे येथील कार्यक्रमांमध्ये स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे पी. के. सिंग, अविनाश जगताप, श्रीपाद शिंदे व इतर मान्यवर उपस्थित होते.

