पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत कल्याणची वैष्णवी पाटील अंतिम फेरीत.
कल्याण प्रतिनिधी दि २४ मार्च कल्याण जवळील मंगरूळ गावची पैलवान म्हणून नावारूपास आलेली वैष्णवी दिलीप पाटील सांगली येथील होणाऱ्या पहिल्या महाराष्ट्र केसरी महिला या स्पर्धेमध्ये अंतिम फेरीत प्रवेश केल्या असून सांगली आणि कल्याण या दोन ह्याच्यामध्ये होणारी ही अंतिम आणि पहिली महाराष्ट्र केसरी स्पर्धा आहे. याकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागला असून कल्याणची वैष्णवी पाटील जय बजरंग तालीम येथे वस्ताद पंढरीनाथ ढोणे व वसंत साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणारी असुन लहानपणापासूनच कुस्तीची आवड असणारी खेळाडु आहे. आतापर्यंत तिने सहा ते सात राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धा गाजवल्या आहेत. वैष्णवी या महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेमध्ये अंतिम लढतीपर्यंत पोहंचली असून तिच्या कामगिरीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. वैष्णवी पाटील हिला वडील दिलीप पाटील आणि आई पुष्पा पाटील यांचेही घरातून कुस्ती – पैलवानकीकडे ओढा होता आणि मुलीला राज्य राष्ट्रीय लेव्हल पर्यंत तसंच आंतरराष्ट्रीय लेव्हल पर्यंत त्यांनी बाळगलेला स्वप्न मला पूर्ण करायचा असून महाराष्ट्र केसरी ह्या स्पर्धेपर्यंतच मला न थांबता मला आंतरराष्ट्रीय आणि ऑलम्पिक पर्यंत मजल मारायचे आहे असे वैष्णवीने सांगितले आहे.