राम नामाच्या जयघोषात नववर्ष प्रतिपदा, गुढीपाडवा श्री केशवराज शाळेत उत्साहात साजरा.
लातूर दि २४ मार्च प्रभू रामरायाच्या आगमनाने श्री केशवराज प्राथमिक विद्यालयात गुढीपाडवा सण उत्साहात साजरा. श्री केशवराज प्राथमिक विद्यालय दिनांक 23 मार्च 2023 वार गुरुवार या दिवशी दुपारच्या सत्रात इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्या सहकार्यातून ‘प्रभू रामाचे अयोध्येतील आगमन’हा प्रसंग सादर केला गेला. त्यासाठी प्रत्येक वर्गाला वेशभूषा निवडून दिली गेली होती.त्यामध्ये राम लक्ष्मण, सीता, हनुमान जामुवंत, बिभीषण, कौशल्या सुमित्रा, कैकयी, तीन राण्या भरत, शत्रुघ्न ,वशिष्ठ ,वाल्मिकी, नारद मुनी अशा विविध वेशभूषा या ठिकाणी विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर अशा साकारल्या होत्या. प्रभू रामचंद्र 14 वर्षे वनवास संपवून, रावणाचा वध करून जेव्हा आयोध्येमध्ये येतात तेव्हा आयोध्येतील प्रजा कशी आनंदी होऊन दारोदारी सडा, रांगोळी गुड्या उभारणे, पुष्पवृष्टी करणे औक्षण करणे या सर्व बाबी या प्रसंगात दाखवण्यात आल्या. या कार्यक्रमात इयत्ता पहिलीच्या मुलांनी गुढ्या उभारल्या तर पहिलीच्या मुलींनी प्रभू राम सीता, लक्ष्मण यांच्यावर पुष्पवृष्टी केली. इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सर्व वेशभूषा साकारल्या. हा देखावा सादर करण्याच्या मागे जो उद्देश आहे तो म्हणजे विद्यार्थ्यांना गुढीपाडवा सण का साजरा करतात हे माहितीरूपी सांगण्यापेक्षा प्रत्यक्ष त्यांचा सहभाग घेऊन प्रत्यक्ष देखाव्याच्या रूपाने त्यांना हा सण कळावा त्याचे महत्व कळावे यासाठी या सर्व गोष्टीचे नियोजन केले गेले. अतिशय सुंदर, उत्कृष्ट अशा पद्धतीने रामाचे आयोध्येतील आगमन हा प्रसंग, हा देखावा विद्यार्थ्यांनी सादर केला. या कार्यक्रमासाठी विशेष म्हणजे शालेय समितीच्या अध्यक्षा सौ. योगिनी ताई खरे व शाळेचे माननीय मुख्याध्यापक शिवाजी अंगद हेंडगे सर, विभाग प्रमुख सौ.देशपांडे बाई व सर्व शिक्षक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते. शालेय समिती अध्यक्षा सौ. खरे ताई यांनी विद्यार्थ्यांचे व मंडळ प्रमुख तसेच सर्व शिक्षकांचे खूप कौतुक केले. अशा प्रकारे श्री केशवराज प्राथमिक विद्यालयात प्रत्यक्ष आयोध्या नगरी अवतरल्यासारखे चित्र या सादरीकरणातून निर्माण झाले होते. त्यामुळेच प्रभू रामरायाच्या आगमनाने श्री केशवराज प्राथमिक विद्यालयात गुढीपाडवा हा सण अतिशय उत्साहात साजरा केला गेला. याबरोबरच सकाळच्या सत्रामध्ये इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी गुढीपाडव्यानिमित्त विद्यार्थ्यांना पॉकेट डायरी करून त्यामध्ये दररोज आपण केलेले दोन चांगले काम, सत्कार्य लिहिण्याचा उपक्रम घेतला. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये दररोज लिहिण्याची सवय निर्माण होईल, तसेच किमान दोन चांगले काम करण्याची सवय लागेल, यामुळे हा उपक्रम घेतला. त्यासाठी सर्व वर्गाचा छान प्रतिसाद मिळाला. अशाप्रकारे श्री केशवराज प्राथमिक विद्यालयात गुढीपाडवा हा सण विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष सक्रिय सहभागातून अतिशय उत्साहात साजरा केला गेला.
