व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ. सितम सोनवणे.
लातूर दि २४ मार्च : व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकारांच्या संघटनेच्या डिजिटल विभागाच्या लातूर जिल्हाध्यक्षपदी डॉ. सितम सोनवणे यांची निवड करण्यात आल्याचे प्रदेशाध्यक्ष जयपाल गायकवाड यांनी जाहीर केले आहे.
व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे व प्रदेशाध्यक्ष राजा माने यांच्या आदेशावरून संघटनेच्या डिजिटल विभागाचे प्रदेशाध्यक्ष जयपाल गायकवाड यांनी डॉ. सितम सोनवणे यांची निवड संघटनेचे बळकटीकरण व संघटनेची ध्येयधोरणे पत्रकारांपर्यंत पोहोचविण्यासाठी केली आहे. डॉ. सोनवणे यांच्या निवडीचे स्वागत संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी फड, टेलिव्हिजन विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष निशांत भद्रेश्वर, प्रदेश संघटक दीपरत्न निलंगेकर, जिल्हा सरचिटणीस संगम कोटलवार, जिल्हा कार्याध्यक्ष शहाजी पवार व जिल्हाभरातील पत्रकारांनी केले आहे.
दरम्यान संघटनेच्या डिजिटल जिल्हा कार्यकारिणीची निवड लवकरच करण्यात येणार असल्याचे नूतन जिल्हाध्यक्ष डॉ. सितम सोनवणे यांनी सांगितले.