पहिल्या महिला महाराष्ट्र केसरीसाठी सांगलीची प्रतिक्षा बागडी विजेती तर कल्याण ची वैष्णवी पाटील उपविजेती.
कल्याण दि २५ मार्च महाराष्ट्रात प्रथमच चालू झालेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सांगलीच्या प्रतीक्षा बागडी ने कल्याणच्या वैष्णवी पाटीलचा निसटता पराभव करत महाराष्ट्राची पहिली महाराष्ट्र केसरी होण्याचा किताब पटकावला. या स्पर्धा सांगली येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. आतापर्यंत फक्त पुरुषाचीच महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा महाराष्ट्र मध्ये संपन्न होत होती; परंतु राज्यामधील महिला कुस्तीपटू ची संख्या पाहता आणि महिला कुस्तीपटूंनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळवलेले यश पाहता महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा व्हावी यासाठी गेले अनेक वर्ष यासाठी प्रयत्न सुरू होते. या प्रयत्नांना यश मिळत पहिल्यांदाच सांगली येथे महिला महाराष्ट्र केसरी किताब ही स्पर्धा भरवण्यात आली होती. या स्पर्धेत राज्यातील अनेक दिग्गज महिला खेळाडूंबरोबरच उदयमुख महिला खेळाडूंनी सहभाग घेऊन प्रचंड प्रतिसाद दिला होता. कुस्तीत पश्चिम महाराष्ट्राची दबदबा अजूनही कायम आहे. सांगली कोल्हापूर सातारा या जिल्हांच्या महिला खेळाडुंच्या चुरसीच्या लढती झाल्या यात सांगलीच्या प्रतीक्षा बागडीने अंतिम टप्प्यात पोहंचुन महिला महाराष्ट्र केसरी किताब मिळवत हे यश संपादन केले आहे. या स्पर्धेत कल्याण ची वैष्णवी पाटीलचा निसटता पराभव स्विकारावा लागला. या स्पर्धेतील अंतिम लढत अत्यंत प्रेक्षणीय होती तर कल्याण च्या वैष्णवी पाटीलचा थोडक्यात पराभव झाल्यामुळे प्रतिक्षाला पुरता घाम फुटला होता.

महाराष्ट्र केसरी या स्पर्धेमुळे कल्याणची वैष्णवी पाटीलची ओळख अख्या महाराष्ट्राला झाली यापुढे स्पर्धा महिलांच्या स्पर्धेमध्ये मोठा प्रतिसाद मिळणार असून पुढेही महिलांच्या हिंदकेसरी पंजाब केसरी या स्पर्धा सुरू होतील अशी आशा खेळाडुमधे आहेत.
