फ्री व्हाईस ग्रुप चे लातूरात एप्रिल मधे “भिम फेस्टीव्हल”
लातूर दि 30 मार्च डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त या वर्षात फ्री व्हाईस ग्रुप, लातूर यांच्या वतिने “भिम फेस्टीव्हल” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. त्या निमित्त भिम फेस्टीव्हल 2023′ च्या अध्यक्ष सुजाता आजनीकर, कार्याध्यक्ष यु.डी. गायकवाड, सचिव डॉ. हर्षवर्धन कोल्हापुरे व कोषाध्यक्ष अॅड. राजकुमार गंडले व सांस्कृतिक प्रमुख सुशिल सुर्यवंशी यांच्या उपस्थितीत व्हिजन हॉस्पीटल, लातूर येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
या पत्रकार परिषदेत अध्यक्ष सुजाता आजनीकर यांनी सांगीतले की, दि. 09 एप्रिल रोजी सम्राट अशोक जयंती, दि. 11 एप्रिल रोजी महात्मा फुले जयंती व दि. 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सर्वरोग निदान आरोग्य शिबीर, व म. फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या कार्यावरील माहितीची स्पर्धा परीक्षा घेण्यात येणार असून त्यानंतर दि. 23 एप्रिल रोजी गरुड चौक ते डॉ. बाबसाहेब आंबेडकर पार्क पर्यंत भव्य मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात येणार आहे. त्यानंतर सर्व समाजातील युवक, विद्यार्थी, महिला यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी गायन स्पर्धा, नृत्य स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, मिमिक्री, वक्तृत्व स्पर्धा, स्टैंडअप कॉमेडी या स्पर्धा घेण्यात येणार असून त्या स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक येणाऱ्या स्पर्धकांना दि. 30 एप्रिल रोजी बक्षिस वितरण समारंभ करण्यात येणार आहे. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा गुणगौरव सोहळा देखील संपन्न होईल व भिम फेस्टीव्हल समारोप होईल. या भिम फेस्टीव्हलमध्ये जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन प्रा. बापु गायकवाड, प्रा. युवराज धसवाडीकर, डॉ. अजय ओव्हळ, डॉ. यशपाल कांबळे, डॉ. सुनिल होळीकर, डी.एस. नरसिंगे, प्रा. लहु वाघमारे, अॅड. सुभेदार मादळे, मे. राजाराम साबळे, डॉ. सदानंद कांबळे, डॉ. सचिन जाधव, डॉ. महेंद्र कांबळे, प्रा. अंतेश्वर गायकवाड, प्रा. राहुलदेव कदम, प्रा. दुष्यंत कटारे, प्रा. डॉ. अशोक नारनवरे तसेच बरकत काझी, अॅड. राजकुमार गंडले, इंजि. शीलरत्न सूर्यवंशी, नरसिंग घोडके, प्रा. देवदत्त सावंत, सुजाता साबळे, अहिल्या कसपटे, राजु चिलवंत, विलास आल्टे, संघपाल शिंदे, लालासाहेब बनसोडे, बंसी लोंढे, राम कोरडे, वैभव सुरवसे, डॉ. रामेश्वर खंदारे, हनुमंत कांबळे, सिद्धार्थ लामतुरे, बालाजी वाघमारे, राजु ढाले यांनी केले आहे.