लातूर जिल्ह्यातल्या ६३ गावांमध्ये शेत-पाणंद रस्त्यांना मंजुरी
खासदार सुधाकर शृंगारे यांच्या पाठपुराव्याला यश
जिल्ह्यातल्या दहा तालुक्यांमधील कामांना मंजुरी
लातूर दि ०६ एप्रिल प्रतिनिधी : खासदार सुधाकर शृंगारे यांनी राज्य सरकारकडे मागणी करीत पाठपुरावा केलेल्या लातूर जिल्ह्यातल्या ६३ गावांमधील शेत,पाणंद रस्त्यांना मंजुरी देण्यात आली आहे, त्यामुळे जिल्ह्यातल्या दहा तालुक्यांमधील शेतकरी आणि नागरिकांची सोय होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या शेत आणि पाणंद रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. त्यामुळे खासदार सुधाकर शृंगारे यांनी मातोश्री ग्रामसमृद्धी शेत, पाणंद रस्ता विकास योजने अंतर्गत या रस्त्यांना मंजुरी देण्यात यावी अशी मागणी केली होती. त्या नंतर अध्यादेश काढत रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांनी या रस्त्यांच्या कामांना मंजुरी दिली आहे.
लातूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातील एकूण २६४ शेत, पाणंद रस्त्यांना मंजुरी देण्यात आली आहे, त्यापैकी ६३ गावांमधील रस्त्यांच्या कामांची खासदार सुधाकर शृंगारे यांनी मागणी करीत मंजुरी मिळवली आहे. खासदार सुधाकर शृंगारे यांनी पाठपुरावा करीत मंजुरी मिळवलेल्या रस्त्यांची कामे तालुकानिहाय अशी आहेत. उदगीर तालुका – हाकनाकवाडी, लोणी कासरराळ, कल्लूर, तोंडार-०३ कामे, शंभू उमरगा, मोघा, हंगरगा-०२ कामे, तोंडचिर, खेरडा, नागलगाव, करडखेल-०२ कामे, करवंदी-२ कामे, मल्लापूर-०२ कामे चाकूर तालुका-शिवनखेड (बु.)-०६ कामे , घरणी, हटकरवाडी, नायगाव, अष्ठा-०२ कामे, बेलगाव-०२ कामे , जळकोट तालुका – गुत्ती येवरी, रुपाला तांडा, होकर्णा औसा तालुका- शिवली-०२ कामे. बऱ्हाणपूर-०३ कामे. लातूर तालुका – भोयरा, अखरवाई, खाडगाव, गंगापूर-०२ कामे, टाकळगाव, निलंगा तालुका- पानचिंचोली-०२ कामे. देवणी तालुका- सय्यदपूर. अहमदपूर तालुका – सुमठाणा, नागझरी, विळेगाव, शेंद्री, टाकळगाव, नागठाणा, वायगाव, गुंजोटी रेणापूर- पानगाव-०२ कामे. अशी एकूण ६३ गावांच्या शेत, पाणंद रस्त्यांची कामे मंजूर करण्यात आली आहेत. खासदार सुधाकर शृंगारे हे गेल्या दोन महिन्यांपासून या रस्त्यांच्या मंजुरीसाठी पाठपुरावा करीत होते. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांची सोय होणार आहे. खासदार सुधाकर शृंगारे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून यामुळे ग्रामीण भागातील शेत पाणंद रस्त्यांच्या कामाला वेग येणार असल्याचे त्यांचे स्विय सहाय्यक श्री भोसले यांनी लातूर नेता न्युज शी दिलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.