लातूर पोलीसांनी केली नमाज अदा करण्यासाठी आलेल्या मुस्लिम बांधवांना पाणी पिण्याची सोय.
लातूर दि 22 एप्रिल नेहमीच कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी कायद्याचा बडगा उगारणारे पोलीस प्रशासनाकडून आज दि 22 एप्रिल रोजी इदगाह मैदानात सामूहिक नजाज अदा करम्यासाठी आलेल्या हजारो मुस्लिम बांधवांना पिण्याच्या पाण्याची सोय केली होती. सध्या तयार होत असलेले एल निन्यो वातावरणामुळे कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हि खास खबरदारी घेण्यात आली असावी. या नमाज अदा करण्यासाठी आलेल्या मुस्लिम बांधवांना पुरक त्या व्यवस्थेसह योग्य ती खबरदारी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे यांनी घेतली होती. त्यानी मुस्लिम बांधवांचे गुलाब पुष्प देऊनही शुभेच्छा दिल्या आहेत.