रमजान ईद आणि महात्मा बसवेश्वर जयंतीला खासदार श्रृंगारे यांची उपस्थिती.
लातूर दि 22 एप्रिल मुस्लिम समाजातील पवित्र समजल्या जाणाऱ्या रमजान या सण व महात्मा बसवेश्वर जयंती साठी खासदार श्री सुधाकर श्रृंगारे, आमदार श्री अमित देशमुख, शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्यासह अनेक राजकीय मंडळी लातूर शहरातील नमाज अदा करण्यासाठी आलेल्या मुस्लिम बांधवांना भेटून शुभेच्छा दिल्या. यावेळी ईदगाह मैदानावर कमी असलेल्या भौतिक सुविधा पुर्ण करण्यासाठी आश्वासन देत मुस्लिम समाजाच्या सुखदुःखात मि सहभागी आहे असे यावेळी खासदार श्री सुधाकर श्रृंगारे यांनी सांगितले. ते महात्मा बसवेश्वर कॉलेज जवळील महात्मा बसवेश्वर यांच्या सिंहासनरुढ पुतळ्यास भेट देवून जयंती समितीच्या कार्यक्रमास उपस्थितीही लावली आहे.