राष्ट्रीय कॅडेट व ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धा जुलै महिन्यात होणारराष्ट्रीय कॅडेट व ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धा जुलै महिन्यात होणार

राष्ट्रीय कॅडेट व ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धा जुलै महिन्यात होणार

भारतीय फेडरेशन कडून खेळाडूंना बार कोड सह युआयडी नंबर मिळणार

बीड प्रतिनिधी : तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया कडून २०२३ या वर्षाचा राष्ट्रीय ज्युनिअर व कॅडेट्स स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर केला असून, राष्ट्रीय ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धा शिवमोगा, कर्नाटक येथे दिनांक ६ ते ९ जुलै २०२३ दरम्यान जाहीर करण्यात आला आहे, तर राष्ट्रीय कॅडेट तायक्वांदो स्पर्धा २०२३ लखन्नौ, उत्तर प्रदेश येथे दिनांक २० ते २३ जुलै २०२३ दरम्यान होणार आहेत. भारतीय फेडरेशन कडून इतर फेडरेशन प्रमाणे खेळाडू, प्रशिक्षक व पंचांना युनिक आयडेंटिफिकेशन नंबर मिळणार असल्याची माहिती तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र,मुंबई असोसिएशनचे अध्यक्ष डॉ अविनाश बारगजे व महासचिव मिलिंद पठारे यांनी दिली आहे.

राष्ट्रीय कॅडेट व ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धांच्या अनुषंगाने तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबई च्या वतीने जुन महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात ३३ वी महाराष्ट्र राज्य ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धा २०२३ तर ६ वी महाराष्ट्र राज्य कॅडेट तायक्वांदो स्पर्धा २०२३ जून महिन्यात शेवटच्या आठवड्यात आयोजित करण्याचे नियोजन सूरु आहे. तरी महाराष्ट्रातील सर्व जिल्हा संघटनांनी आपापल्या जिल्ह्यातील जिल्हा तायक्वांदो स्पर्धांचे आयोजन वेळेत करावे व स्पर्धेचा निकाल वेळेत राज्य संघटनेला पाठवण्यात यावा, असे आवाहन तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मुंबई या राज्य संघटनेचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, उपाध्यक्ष प्रवीण बोरसे, दुलीचंद मेश्राम, महासचिव मिलिंद पठारे, सचिव सुभाष पाटील, कोषाध्यक्ष व्यंकटेश कररा, सदस्य निरज बोरसे, अजित घारगे व सतिश खेमसकर सर्व कार्यकारी मंडळाच्या वतीने केले आहे.

वयोमर्यादा कालावधी
ज्युनिअर – १/१/२००६ ते ३१/१२/२००८
कॅडेट – दिनांक १/१/२००९ ते ३१/१२/२०११
सब ज्युनियर – ०१/०१/२०१२ नंतर जन्म झालेला असावा.

टीएफआय खेळाडूंना ओळखपत्र (यूआयडी आयडी कार्ड) देणार !

भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयाची मान्यता असलेल्या तायक्वोंडो फेडरेशन ऑफ इंडियाने (TFI) परिपत्रकाद्वारे कळविले आहे की, ओळखपत्राशिवाय खेळाडूंना
राज्य अजिंक्यपद आणि राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत तसेच कोणत्याही सेमिनार मध्ये भाग घेता येणार नाही. फेडरेशनचा वेबसाईड मध्ये खेळाडू, प्रशिक्षक, रेफरी इत्यादींचे सर्व तपशील समाविष्ट करण्याचा प्रयत्न आहे. राज्यनिहाय सर्व संलग्न राज्य संघटनांना व जिल्हा संघटनेला एक यूआयडी (युनिक आयडेंटिफिकेशन नंबर) दिला जाणार असून जेणेकरून राज्यातील खेळाडू, प्रशिक्षक, रेफरी यांची माहिती सहज मिळू शकेल. सर्व विद्यमान कलरबेल्ट धारक खेळाडू, ब्लॅकबेल्ट धारक, प्रशिक्षक व पंचांसाठी देखील फेडरेशन ओळखपत्र जारी करणार आहे. या कार्डमध्ये बार कोड वापरला जाईल , ज्यामुळे राज्यांतील खेळाडू, प्रशिक्षक किंवा रेफरी यांचा डेटा अगदी सहजपणे पुनर्प्राप्त करणे सोपे होणार आहे. महाराष्ट्र राज्यांमध्ये त्वरित UID (UNIQUE IDENTIFICATION NUMBER) ओळखपत्रांची अंमलबजावणी सुरू करणार असुन यामुळे वयाची फसवणूक टाळण्यासाठी आणि खेळाडूंची संपूर्ण अचूक ओळख सुलभ होणार आहे, अशी माहिती तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र राज्य संघटनेचे अध्यक्ष डॉ अविनाश बारगजे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!