श्री बंकटलाल लाहोटी इंग्लीश सीबीएसई स्कूल च्या निकाल शंभर टक्के.
शाळेने केला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार; पालकांचा उस्फूर्त प्रतिसाद.
लातूर दि 13 मे मार्च २०२३ मध्ये संपन्न झालेल्या दहावी CBSE बोर्डाच्या परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असून शाळेतील सात विद्यार्थी ९५% पेक्षा अधिक गुण, विस विद्यार्थी ९० ते ९५% गुण तर तिस विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले. प्रतीक किने या विद्यार्थ्याने ९७.६०% घेऊन शाळेत प्रथम येण्याचा मान मिळविला, ९५% पेक्षा अधिक गुण मंत्री भूमी, गुमे निखिल, पाटेवाड शर्वरी, सोनी आशुतोष, मलवाडे कृष्णा यांनी प्राप्त केले असून शाळेने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. याप्रसंगी शाळेने सर्व विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना आमंत्रित करून गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष डॉ अनिल राठी, सदस्य डॉ मेहुल राठोड यांच्या हस्ते सर्व गुणवंतांचा गुणगौरव करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष शैलेश लाहोटी विश्वस्थ मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, उपाध्यक्ष राजेंद्रकुमार मालपाणी, सचिव आशिष बाजपाई, कोषाध्यक्ष ईश्वरप्रसाद डागा, दिनेश ईन्नानी, कमलकिशोर अग्रवाल, सुनील लोहिया, आनंदजी लाहोटी, सतीशचंद्र चापसी, सुहास शेट्टी, डॉ अनुप अग्रवाल, आणि मनीष कलंत्री यांनी सर्व गुणवंतांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याबरोबरच शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत बुक्कावार, उपप्राचार्य वैभव पोतदार, समन्वयक विकास येवते व शिक्षकांनी विद्यार्थांना शुभेच्छा दिल्या.