समृद्ध महाराष्ट्रासाठी उध्दव ठाकरे यांच्याच नेतृत्वाची गरज - जिल्हाप्रमुख शिवाजी मानेसमृद्ध महाराष्ट्रासाठी उध्दव ठाकरे यांच्याच नेतृत्वाची गरज - जिल्हाप्रमुख शिवाजी माने

समृद्ध महाराष्ट्रासाठी उध्दव ठाकरे यांच्याच नेतृत्वाची गरज – जिल्हाप्रमुख शिवाजी माने

लातूर दि 15 मे जिल्ह्यातील लातूर, औसा, देवणी, शिरुर अनंतपाळ, निलंगा तालुक्यातील शिवसेना उध्दव ठाकरे यांच्या पदाधिकार्यांची पक्ष बांधणीसाठी बैठक बोलाविण्यात आली होती. समृद्ध महाराष्ट्रासाठी उध्दव ठाकरे यांच्याच नेतृत्वाची गरज आहे. या बैठकीला मार्गदर्शन करताना लातूर शिवसेना जिल्हाप्रमुख श्री शिवाजीराव माने हे बोलत होते. न्यायालयाकडून शिवसैनिकांना योग्य न्याय मिळेल याची आशा होती. पण आलेल्या या निर्णयामुळे हे सरकार आऊट घटकेचे सरकार ठरले आहे. निश्चितच लवकर शिवसैनिकांना दिलासा देणारा निर्णय येणार आहे या निर्णयानंतर या सरकारचा पाय उतार होणार असल्याचेही ते बोलत होते. महाराष्ट्रातील जनता येणाऱ्या काळात या सरकारला आणि षडयंत्री भाजपाला त्यांची जागा दाखवेल याची आशा आहे. त्या अनुषंगानेच आपली मोर्चे बांधणी करावी असा सल्लाही यावेळी देण्यात आला आहे. याचबरोबर शिवसेनेचे मार्गदर्शक सी के मुरळीकर, उपजिल्हाप्रमुख विष्णू साबदे, उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ सगरे, तालुकाप्रमुख अविनाश रेशमी, बाबुराव शेळके तानाजी सुरवसे, भागवत वंगे, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सौ सुनीता ताई चाळक, युवा सेना जिल्हाप्रमुख ॲड राहुल मातोळकर, युती सेना जिल्हाप्रमुख ॲड श्रद्धा जवळगेकर, कामगार सेनेचा जिल्हा संघटिका सौ प्रीती ताई कोळी आदींनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी लातूर शहर प्रमुख रमेश माळी, विधानसभा संघटक माधव कलमुकले, समन्वयक युवराज वंजारे, सहसमन्वयक पत्रकार सोमनाथ स्वामी, सचिन नळेगावकर, युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख ॲड राहुल पिचारे, ॲड कवेकर नारायण, गणपतराव पाटील, बाळू दंडीमे, महिला आघाडी उपजिल्हा संघटक सरोजाताई गायकवाड, तालुका संघटिका रेखा पुजारी, शहर संघटिका पूजा सगर, शिरूर आनंदपाळचे ज्येष्ठ शिवसैनिक तथा ज्येष्ठ कवी गोविंद श्रीमंगले, श्रीराम कुलकर्णी, देवणी शहराचे शहर प्रमुख दीपक स्वामी, उपतालुकाप्रमुख लातूर शहरातील उपशहर प्रमुख रघु बनसोडे, शिवराज मुळावकर, गंगणे राम तीपण्णा बोने, अजय घोणे इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!