राष्ट्रीय तायक्वांदो ब्लॅक बेल्ट दान परीक्षा उत्साहात प्रारंभ.
राष्ट्रीय पंच परीक्षा सेमिनारला सुरुवात.
रत्नागिरी प्रतिनिधी : तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रातर्फे रत्नागिरी येथे आयोजित ब्लॅक बेल्ट (दान) परीक्षेत राज्यातील ३०० हून अधिक खेळाडूंनी उत्तम प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांच्या हस्ते उदघाटन करून उत्साहात प्रारंभ झाला.
यावेळी तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ.अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पठारे, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते प्रवीण बोरसे, रत्नागिरी तायक्वांदो असोसिएशनचे अध्यक्ष व्यंकटेश कररा, राज्य संघटनेचे सदस्य सतीश खेमस्कर, आंतर राषट्रीय पंच लक्ष्मण कररा आदी उपस्थित होते. या स्पर्धेत राज्यभरातून जवळपास 300 खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे. या परीक्षा तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने घेण्यात आल्या. दिवसभर या परीक्षा मध्ये पूमस्से, क्योरोगी, ब्रेकींग, सेल्फ डिफेनस, फिटनेस टेस्ट पार पडल्या. भारतीय ऑलिम्पिक संघटनेने टीएफआयला मान्यता दिल्यानंतर पहिल्यांदाच या परीक्षा रत्नागिरीत होत आहे. सोमवार पासून तीन दिवस राष्ट्रीय पंच परीक्षा येथे पार पडणार आहे. या पंच परीक्षेत ही राज्यभरातून जवळ जवळ ३५० खेळाडू उपस्थित असणार आहेत. ब्लॅक बेल्ट परीक्षेत 1 दान, 2 दान, 3 दान व 4 दान या पदवीची परीक्षा पार पडली. यावेळी डॉ. अविनाश बारगजे, मिलिंद पठारे, प्रवीण बोरसे व लक्ष्मण कर्रा यांनी परीक्षक म्हणून काम पहिले.
इंडियन ऑलिंपिकच्या मान्यतेमुळे खेळाडू मध्ये उत्साह !!
भारत सरकार ची मान्यता मिळाल्यानंतर 18 मे रोजी इंडियन ओलंपिक असोसिएशन मान्यता देखील तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाला मिळाल्याबद्दल सर्व खेळाडू प्रशिक्षक व सर्व जिल्हा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये या ठिकाणी मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.

जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिह यांनी राज्यभरातून आलेल्या तायक्वांदोपटू ना या परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, खेळामुले आपले शरीर तंदुरुस्त राहते. मी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना खूप सडपातळ होतो, नंतर मी जिममध्ये व्यायाम सुरु केला. आजही मी नियमित व्यायाम करतो. सकाळीच स्वच्छता अभियानात सहभागी होऊन इथं आलो आहे. खेळाडूंनी सरावात सातत्य ठेऊन आपले उदिष्ठ गाठावे. खेळाडूंना आता बऱ्याचं संधी आहेत, असे ते म्हणाले.