Latur taekwondoLatur taekwondo

तायक्वांडो ब्लॅक बेल्ट परीक्षेत लातूर जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे २ खेळाडू उत्तीर्ण.

लातूर दि.२९ प्रतिनिधी : तायक्वांडो फेडरेशन ऑफ इंडिया व तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मुंबई, यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २८ मे २०२३ रोजी छत्रपती संभाजीनगर, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ बॅडमिंटन हॉल येथे ब्लॅक बेल्ट (डॅन) परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेत १७७ खेळाडूंनी यशस्वी सहभाग नोंदविला. लातूर जिल्हा तायक्वांडो असोसिएशन च्या दोन खेळाडूंनी या परीक्षेत यश संपादन केले आहे. या परीक्षेसाठी परिक्षक म्हणून दोन वेळा शिवछञपती क्रीडा पुरस्कर्ते असलेले श्री प्रविण बोरसे, ताम अध्यक्ष डाॅ श्री अविनाश बारगजे, ताम महासचिव श्री मिलींद पठारे, श्री दुलिचंद मेश्राम, श्री व्यंकटेश कर्रा, श्री निरज बोरसे यांनी काम पाहिले तर या खेळाडुंना आशियाई महासंघाचे प्रशिक्षक तथा तायक्वांदो राष्ट्रीय पंच व लातूर तायक्वांदो जिल्हासचिव श्री नेताजी जाधव यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले.

या ब्लॅक बेल्ट परीक्षेतील उत्तीर्ण झालेल्या कु जान्हवी विनोद मदने व रुद्राक्ष राजेश रुमणे यांचे तायक्वांदो जिल्हा संघटनेचे अध्यक्ष श्री पाटील, संघटनेचे आधारस्तंभ श्री महादुभाऊ रसाळ, बंटी गायकवाड गोदावरी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सावंत, क्रीडा शिक्षिका सौ संदिकर, सौ डोईजोडे, राजा नारायणलाल लाहोटी शाळेचे मुख्य रजिस्टार श्री प्रविण शिवणगिकर, श्री बंकटलाल लाहोटी शाळेचे मुख्याध्यापक श्री बुक्कावार, उपमुख्याध्यापक श्री पोतदार, श्री केशवराज विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री कुलकर्णी, क्रीडा शिक्षक, श्री गरुड, श्री झुंजारे स्वामी विवेकानंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री सुधाकर बावकर यांनी कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!