मातंग समाज कृती समितीची रेणापूर येथे मयत गिरीधारी तपघाले यांची घरी भेट.
रेणापूर दि 07 जुन रेणापूर येथे मातंग समाजातील गिरीधारी तपघाले यांची व्याजी पैश्याच्या कारणावरून दोन्ही हात मोडत मिरची पावडर टाकून बेदम मार देत आरोपी लक्ष्मण मारकड व त्याचा भाचाने जिव घेतला. अंतविधी उरकून घरी परतत असलेल्या मयताच्या पत्नीला व मुलीला आरोपीच्या नातेवाईकांकडून जातीवाचक शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिल्यामुळे मातंग समाज कृती समितीच्या मंडळाने तात्काळ घटनास्थळावर भेट देत पोलीस संरक्षण वाढवण्यासाठी रेणापुर सहाय्यक पोलीस निरीक्षकांना विनंती केली व मयताच्या नातेवाईकांचे सांत्वन करत मातंग समाज कृती समितीचे जि ए गायकवाड, विकास कांबळे, मिथुन गायकवाड, आकाश मोठेराव, नेताजी जाधव यांनी धीर दिला.
देशात दलित समाज सुरक्षीत नसुन मातंग समाजावर असे अन्याय अत्याचार नेहमी होत आहेत. राखीव मतदारसंघातून निवडून आलेले दलित खासदार यांनी पिडीतांना भेट देऊन घटनेची चौकशी करणे गरजेचे होते व आरोपीला कडक शासन करण्यासंदर्भात हालचाली करणे गरजेचे होते पण हे असे होताना दिसत नाही. या प्रकरणी लोकप्रनिधींनी लक्ष घालावे असे कृती समितीचे श्री विकास कांबळे यांनी यावेळी मत व्यक्त केले आहे.