दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा काँग्रेस प्रभाग 03 च्या वतिने सत्कार समारंभ संपन्न.
लातूर दि १० जुन काँग्रेस प्रभाग तिन मधील इयत्ता दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आल्याचे प्रभाग क्रमांक तिन चे अध्यक्ष तथा संत गोरोबा सोसायटी चेअरमन श्री विकास कांबळे यांनी सांगितले या कार्यक्रमासाठी असंघटित कामगार कल्याण विभागाचे काँग्रेस प्रदेश सचिव राजकुमार होळीकर यांची उपस्थिती होती.
यावेळी ॲड. राजेंद्र लोंढे पूर्वभाग कृती समितीचे दीपक गंगणे, बाबासाहेब बनसोडे, चिंचोले सर, शरीफ भाई, सुभान रकटे, नबी नळेगावकर, देविदास गायकवाड, प्रकाश पाटोळे, भगवान कांबळे, महादू गायकवाड, सतीश शिंदे, पवन कांबळे, शिवलिंग कांबळे, बंकट कांबळे, अशोक शिंदे, राहुल मस्के, विशाल जाधव तसेच प्रभागातील नागरिक व पालक उपस्थित होते.