स्वामी विवेकानंद चौकात “खासदार श्री. सुधाकर श्रंगारे विचार मंच” फलकाचे श्री सुधाकर श्रंगारे यांच्या हस्ते उद्घाटन.
लातूर दि 10 जुन खासदार सुधाकरजी श्रंगारे साहेब यांच्या नावाने विवेकानंद चौक लातूर येथे “खासदार श्री सुधाकर शृंगारे विचार मंचाची स्थापना करण्यात आली आहे. या मंचाच्या फलकाचे अनावरण लातूर जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार मा. श्री. सुधाकरजी शृंगारे यांच्या हस्ते करण्यात आले. या अनावरणाच्या वेळी खासदार सुधाकर श्रृंगारे यांचा सत्कार करण्यात आला. या विचार मंचाच्याद्वारे श्री शृंगारे यांनी केलेल्या मागील चार वर्षातील कार्याचा ओवा पोहा करण्याकरता या मंचाची स्थापना करण्यात आली आहे या मंचाद्वारेच पुढील काळामध्ये प्रभाग तेथे शाखा व गाव तिथे शाखा याची उभारणी करण्याचे विचार ठरविण्यात आले आहे. खासदार शृंगारे यांच्या खासदार फंडातून लातूर परिसरामध्ये व शहरांमध्ये केलेली वेगवेगळे विकासकामे या विकास कार्याचा सामान्य जनतेला होणारा फायदा याच्या विषयीची सर्व माहिती या मंचाच्याद्वारे प्रकाशित करण्यात येणार आहे सोबतच कोरोना सारख्या महामारी मध्ये अन्नदानाचे कार्य, रुग्णांना मदत, विद्यार्थ्यांना मदत, साहेबांचे समाजकार्यातील योगदान , तिरुपती बालाजी यांच्या दर्शनासाठी चे पास रेल्वेच्या मार्फत तात्काळ सुविधा होण्याकरिता खासदारांनी केलेली मदत याविषयीची संपूर्ण माहिती मंचाद्वारे संस्थापक अध्यक्ष तायप्पा कांबळे यांनी दिली. भविष्यात या मंचाद्वारे विविध उपक्रम चालवण्याकरिता विशेष मानस श्री डॉक्टर बोरगावकर नागोराव यांनी सांगितला या कार्यक्रमास यशस्वी करण्याकरता लोकनेते खासदार सुधाकरजी शृंगारे मंच चे सर्व सदस्य यांनी परिश्रम घेतले.
याप्रसंगी विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक तायप्पा कांबळे, सचिव डाँक्टर नागोराव बोरगावकर, सहसचिव ईस्माईल शेख, उपाध्यक्ष प्रा. राजकुमार मलवाडे, राजन सोनवणे, भरत लोंढे, सौ. ज्योती रसाळे, विवेकानंद चौक शाखा अध्यक्ष दिपक गायकवाड, उपाध्यक्ष राहुल कांबळे, सचिव रवी कांबळे, सहसचिव लक्षमण सुर्यवंशी, सदस्य बस्वेश्वर आष्टांगे, समिर शेख, राधाकृष्ण तिकटे, ईरकर ज्ञानेश्वर, बाळू कांबळे, राहुल गायकवाड, प्रकाश जाधव, ईसाकभाई मोमीन, असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.