लातूर जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर
लातूर प्रतिनिधी ०९ जून लातूर जिल्ह्यातील रेणापूर आणि नांदेड जिल्ह्यातील बोंढार हवेली या ठिकाणी झालेल्या दलित हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक कठोर कार्यवाही करावी अशी मागणी लातूर जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या वतीने करण्यात आली असून याबाबतचे लेखी निवेदन शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी लातूर यांना गुरुवारी सादर करण्यात आले. केवळ तीन हजार रुपयांचे कारण समोर करून खाजगी सावकाराने मातंग समाजातील गिरीधर तपघाले यास अमानुष मारहाण केल्याची घटना लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यात घडली. या घटनेत पीडित गिरीधर तपघाले याचा दुर्दैवी अंत झाला. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केल्याचा राग मनात धरून कांही मनुवादी वृत्तीच्या लोकांनी दलित समाजातील अक्षय भालेराव यास संपविल्याची दुर्दैवी घटना नांदेड जिल्ह्यातील बोंढार हवेली या ठिकाणी घडली. या दोन्ही घटना पाहता गेल्या काही दिवसात राज्यातील दलित अत्याचाराच्या घटना वाढत असल्याचे आणि आशा घटना रोखण्यासाठी गृहविभाग कुचकामी ठरत आसल्याचे स्पष्ट होत आहे. या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करीत रेणापूर व नांदेडच्या बोंढार हवेली दलित हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कार्यवाही करावी अशी मागणी लातूर जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी लातूर यांना गुरुवार दिनांक ८ जून रोजी देण्यात आले.
यावेळी ऍड.बाबासाहेब गायकवाड, प्रा.प्रवीण कांबळे, श्रीमंत गायकवाड, श्यामराव सूर्यवंशी, लक्ष्मण कांबळे, रत्नदीप अजनीकर, एन.डी.सोनकांबळे, संजय ओव्होल, बाळासाहेब सरवदे, गणेश गायकवाड, संतोष पटनुरे, कमलाकर शृंगारे, अमोल देडे, चंद्रकांत आडगळे, सुबाराव मस्के, नागनाथ डोंगरे, संतोष मस्के, राजुभाऊ गवळी, संपत सुरवसे, दयानंद कांबळे, किरण बनसोडे, अशोक सूर्यवंशी, बब्रुवान गायकवाड यांच्यासह लातूर जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.