"नामदार चषक" राज्यस्तरीय जुनिअर तायक्वांदो स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद."नामदार चषक" राज्यस्तरीय जुनिअर

२८ जिल्ह्यातील ५०० खेळाडूंचा सहभाग

रत्नागिरी- “नामदार चषक” राज्यस्तरीय जूनियर तायक्वांदो स्पर्धेचे उदघाटन रविवारी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री. किरण सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. २८ जिल्ह्यातील जवळपास ५००खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला असून शिमोगा, कर्नाटक येथे होणाऱ्या राष्ट्रीय ज्युनिअर स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड या ठिकाणी करण्यात येणार आहे.
तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबई व रत्नागिरी स्पोर्ट्स तायक्वांदो असोसिएशन या मान्यता प्राप्त संघटनेच्या अंतर्गत युवा सेना रत्नागिरी यांच्याकडून “नामदार चषक” राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धा आयोजन करण्यात आली आहे. रविवारी सकाळी रत्नागिरी जिल्हा क्रीडा संकुलातील इंदोर हॉल येथे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री किरण सावंत यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी विशाल घोडके, शिवछत्रपती क्रीडा मार्गदर्शक पुरस्काराने सन्मानित मिलिंद पठारे (पुणे), तायक्वांदो खेळात संशोधन केलेले राज्य संघटनेचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे (बीड), शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रवीण बोरसे (पुणे), आंतरराष्ट्रीय पंच सुभाष पाटील (रायगड), राज्य संघटनेचे उपाध्यक्ष धुलीचंद मेश्राम (गोंदिया), राज्य संघटनेचे कोषाध्यक्ष तथा रत्नागिरी स्पोर्ट्स तायक्वांदो असोसिएशनचे अध्यक्ष वेंकटेश्वरराव कररा (रत्नागिरी), राज्य संघटनेचे सदस्य अजित घारगे (जळगाव) , सतीश खेमसकर (चंद्रपूर), राजेश महाजन (उस्मानाबाद) व विनायक ऐनापुरे (सांगली) आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती लाभली. फ्रान्स येथील आंतरराष्ट्रीय शालेय तायक्वांदो स्पर्धेतील कास्यपदक विजेती खेळाडू कु. श्रुतिका टकले व तिचे प्रशिक्षक प्रवीण सोनकुल यांचा यावेळी राज्य संघटनेकडून सत्कार करण्यात आला. किरण सामंत यांचा सत्कार यावेळी जिल्हा व राज्य संघटनेकडून करण्यात आला. विश्वदास लोखंडे, शशांक घडशी, लक्ष्मण कररा , संजय सुर्वे, राम करा, प्रशांत मकवाना, शाहरुख शेख, मिलिंद भागवत यांनी यावेळी पाहुण्यांचा सत्कार केला. गणराज तायक्वांदो क्लब, रत्नागिरी तालुका तायक्वांदो अकॅडमी, स्पर्धा आयोजन समिती मधील सर्व महिलांच्या वतीने तसेच स्क्वॉश असोसिएशन कडूनही यावेळी किरण सामंत यांचा सत्कार करण्यात आला.
भारतीय तायक्वांदो संघटनेच्या राष्ट्रीय जूनियर तायक्वांदो स्पर्धा शिमोगा, कर्नाटका येथे ७ ते ९ जुलै २०२३ दरम्यान होणार असून या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची निवड या राज्यस्तरीय स्पर्धेमधून होणार असल्यामुळे या राज्यस्तरीय स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!