केंद्रीय अर्थ राज्यमंञी भागवत कराड यांच्या हस्ते ऑयकाॅन सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे उद्घाटन संपन्न.
सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे व डाॅ सुधीर निकम यांचीही उपस्थिती.
लातूर दि २६ फेब्रुवारी शहरातील पहिल्या किडनी प्रत्यारोपण केंद्र आयकॉन सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे केंद्रीय वित्त व अर्थ राज्यमंञी भागवत कराड यांच्या हस्ते काल दि २५ फेब्रुवारी रोजी उद्घाटन संपन्न झाले. एकाच छताखाली सर्व सुविधांची उपलब्धी होणार असलेल्या या रुग्णालयात उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष म्हणून लातूर येथील सहकार महर्षी तथा माजी राज्यमंत्री दिलीपराव देशमुख उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणून मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्यासह डॉ. सुधीर निकम हे लाभले होते तर उमरगा लोहारा मतदार संघाचे आमदार ज्ञानराज चौघुले, किडनी प्रत्यारोपण अखिल भारतीय संशोधन केंद्राचे डॉ.विवेक कुटे अहमदाबाद, आयकल आयुक्त पुणे मुकुंद चाटे यांच्यासह माजी खासदार सुनिल गायकवाड, माजी आमदार गोविंदराव केंद्रे, त्र्यंबकआण्णा भिसे, नारायण आबा पाटील, प्रख्यात प्लास्टिक सर्जन डॉ. विठ्ठल लहाने, कॉंग्रेसचे जेष्ठ नेते तथा प्रख्यात सामाजिक वक्ते दादासाहेब मुंडे, आय एम ए डॉक्टर संघटनेचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष डॉ.भराटे, डॉ जटाळ, डॉ किणीकर, डॉ अंबाजोगाई आय.एम.ए.चे अध्यक्ष डॉ नवनाथ घुगे, डॉ विनायक सिरसाट, डॉ सतिश गुट्टे व डॉक्टर, पत्रकार, उद्योजक, सामाजिक-राजकीय पदाधिकारी मंडळींची उपस्थिती होती.

आयकॉनचे संचालक दाम्पत्य डॉ. प्रमोद घुगे व डॉ.सौ.प्रतिभा प्रमोद घुगे यांच्यासह जेष्ठ बंधू विनोद घुगे, सौ वैशाली विनोद घुगे आई श्रीमती अनुसया घुगे, डॉ महेंद्र केंद्रे व संपुर्ण घुगे-केंद्रे परिवार उपस्थित होता. मराठवाड्यातील सुप्रसिद्ध गायक स्वररत्न श्री. सुभाष शेप यांच्या बहारदार संगीत रजनीने उपस्थित जनसमुदाय मंत्रमुग्ध होऊन गेला. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयकॉन हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी तथा जेष्ठ पत्रकार श्री.सुनिल सिरसाट, अभिनेते श्री.बालाजी सुळ आणि श्री.भैरवनाथ कानडे यांनी केले.