बिझिनेस डिलसाठी बोलावून घेत 45 लाखाची खंडणी उकळणाऱ्यांना विवेकानंद पोलीसांनी दिल्लीतून घेतले ताब्यात..
लातूर दि 30 जुन मा पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक श्री अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री भागवत फुंदे, यांचे मार्गदर्शनाखाली अपहरण केलेल्या पिडीत व्यक्तीची दिल्ली येथून सुटका करून कार्यवाही केली आहे. दि 22/06/2022 रोजी लातूर येथून सागर अनिल जाजनूरकर यांना फोनद्वारे खालील नमूद आरोपींनी बिझनेस डिल करणेसाठी पुणे येथे बोलावून घेवून तेथून विमानाने दिल्ली येथे बोलावून घेतले व त्यास थांबून ठेवून 45,00,000/- रुपये अशी खंडीनीची मागणी केली वगैरे फिर्याद पो.स्टे. विवेकानंद चौक, लातूर येथे गुरनं 388 / 2023 कलम 364 (अ) 384, 389, 34 भादंविप्रमाणे गुन्हा दि. 26/06/2022 रोजी अज्ञात आरोपीं विरुध्द दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यापासून 24 तासाचे आत दिल्ली येथे विनामाने प्रवास करून तात्काळ पोलीस पथक पोउपनि महेश गळगटे सफी विलास फुलारी, पोह दिनेश हवा, सारंग लाव्हरे प्रवास करून पिडीत व आरोपींना ताब्यात घेतले.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक पोउपनि महेश गळगटे सफी विलास फुलारी, पोह दिनेश हवा, सारंग लाव्हरे या पथकांने दिल्ली येथे जावून पिडीत सागर अनिल जाजनूरकर व संदीप जनक मांजरे यांना आरोपींच्या ताब्यातून सोडून घेतले व आरोपी नामे (1) संजयकुमार महाविर सिंग, वय 36 वर्ष, घर नं. 1083, सेक्टर 7, चंदीगढ (2) महेश सतीश अरोडा, वय 40 वर्ष, फॅलट नं. 1003 टॉवर 1 विक्टोरिया हाईट्स पिरमुचल्ला झिरकपूर एसएएसनगर मोहाली पंजाब ह.मु. फ्लॅट नं. 191 डिएलएफ कॅपीटल ग्रीन्स करमपूरा मोतीनगर नवी दिल्ली (3) अतुल विरेंद्र उपाध्याय, वय 37 वर्ष, घर नं. 202 / 1 गल्ली नं. 9 एस नगर मणीमांजरा चंदीगढ ह.मु. फ्लॅट नं 376 थर्ड फ्लोअर कनिष्का अपार्टमेंट शालीमार बाग नई दिल्ली (4) विरसिंह जयेश रावत, वय 44 वर्ष, रा. गली निं. 2, आय 26 गढवाली मोहल्ला लक्ष्मीनगर, इस्ट दिल्ली यानां ताब्यात घेवून त्यांना लातूर येथे हजर केले. यातील अटक आरोपी क्र. 01 व 04 यांचेकडून नमूद इसमाचे अपहरण करून नेवून त्याच्याकडून 17,00,000/- रुपयाची मागणी करून ती रक्कम रोख व ऑनलाईन घेतले. गुन्हयातील इतर 6 आरोपी फरार आहेत त्यांचा शोध घेणे चालू आहे.
सदरची कामगीरी ही मा. पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक श्री अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री भागवत फुंदे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, पोउपनि महेश गळगटे, सपोनि रामचंद्र केदार, बालाजी गोणारकर, सफी विलास फुलारी, दिनेश हवा, सारंग लाव्हारे पोलीस अंमलदार, संजय बेरळीकर, खंडू कलकत्ते, सयद बहादूर, वाजीद चिखले, अनिता सातपुते, सायबर सेलचे गणेश साठे, हाल्लाळे, कलबुणे, चालक मरे यांनी केलेली आहे.