दारूबंदी साठी तुंगी गावात महिलांचा एल्गार; ग्रामपंचायतमधे ठराव पारित.
औसा प्रतिनिधी : तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय तुंगी बुद्रुक येथील महिलांनी दारू विरोधी अर्ज दाखल करून ग्रामपंचायतमधे ठराव पारित केला आहे. तुंगी बुद्रुक येथे अवैद्य दारू विक्रीचे प्रमाण वाढले आहे. अवैद्य दारू विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे अनेक माता- भगिनींचे, मुलांचे गावातील अबाल, वृद्ध, स्त्री, पुरुषांना खूप त्रास सहन करावा लागत असुन अनेकांचे कुटुंब उध्वस्त होत आहेत याचा संताप समस्त गावातील माता भगिनीला होत आहे. त्यासंदर्भात आज ग्रामपंचायत कार्यालय तुंगी येथे सरपंच, उपसरपंच ग्रामसेवक यांच्या उपस्थितीत ठराव संमत करण्यात आला आहे. चांगभलं सेवा संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष सोनाली ताई गुलबिले यांच्या मार्गदर्शनाखाली गावामध्ये अवैध दारू विरोधी रॅली काढण्यात आली. यानंतर गावामध्ये कोणी अवैद्य दारू विक्री केली तर त्याच्यावर खडक कारवाईची मागणी केली जाईल व गावातील समस्त महिला तर्फे औसा पोलीस स्टेशन येथे आक्रोश मोर्चा काढला जाईल. या ग्रामपंचायतीच्या ठराव बैठकीसाठी उपस्थित ग्रामसेवक पाटील, उपसरपंच बाजीराव जाधव ,सरपंच मोहन विष्णू कावळे, शिवानी जाधव ,कल्पना घोगरे स्वाती चव्हाण, सरस्वती सूर्यवंशी, सुनिता सूर्यवंशी, तायरा बाद शेख, विजय माला अशा अनेक महिलांच्या स्वाक्षरी सहीने हा ठराव संमत करण्यात आला आहे.
