व्हि एस पँथर्स चे अध्यक्ष श्री खटके यांनी कॅबिनेट मंञी संजय बनसोडे यांची भेट घेत दिल्या शुभेच्छा.
लातूर दि 06 जुलै महाराष्ट्र राज्याच्या राजकीय घडामोडींचा बदलात आमदार संजय बनसोडे यांना नव्याने मिळालेल्या कॅबिनेट मंञीपदामुळे लातूरसह उदगीर चा विकासाला चालना मिळणार असुन लातूरसाठी व बौद्ध समाजासाठी सन्मानाची बाब असल्याचे मत आमदार संजय बनसोडे यांची भेट घेत व्हि एस पँथर्स संघटनेचे अध्यक्ष श्री विनोद खटके यांनी व्यक्त केले. ते लातूरनेता न्युज चॅनेलशी बोलताना पुढे म्हणाले आमदार संजय बनसोडे यांच्यामुळे युवा पिढीच्या कर्तुत्वाला नक्कीच मोठी चालना मिळणार असुन लातूरच्या विकासाला गती मिळेल अशी आशा व्यक्त केली आहे. आमदार श्री संजय बनसोडे यांनी अल्पावधीतच केलेल्या कार्याचा लोकमनातून प्रचंड विश्वास निर्माण केला आहे. त्यामुळेच सर्वसामान्य जनता त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभी असल्याचेही त्यांनी सांगितले. आमदार श्री संजय बनसोडे हे सर्व जाती धर्मातील जनसमुदायासोबत असतात शिवाय ते प्रचंड अभ्यासु, मनमिळाऊ आणि तत्त्वनिष्ठ असल्याचेही मत व्यक्त केले आहे. याचबरोबर श्री विनोद खटके यांनी आमदार श्री संजय बनसोडे यांना व्हि एस पँथर्स संघटनेच्या वताने भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन आम्ही सोबत असल्याचे सांगितले आहे. यावेळी लातूरचे प्रसिद्ध कुशन व्यवसायिक श्री नागेश कांबळे, श्री मयुर बनसोडे व प्रणय मालु उपस्थित होते.