घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक; स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कामगिरीघरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक; स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कामगिरी

घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक; स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कामगिरी

घरफोडीचे 04 गुन्हे उघड. सोन्या-चांदीचे दागिने, चार चाकी वाहनासह 2 लाख 68 हजार रुपयाच्या मुद्देमाल जप्त.

लातूर दि 22 जुलै पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्यामध्ये घडणारे चोरी व घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता आदेशित व निर्देशित केले होते त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे,उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर श्री भागवत फुंदे यांचे मार्गदर्शनात व स्थानिक गुन्हे शाखे चे पोलीस निरीक्षक श्री गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हेचे विविध पथके तयार करून जिल्ह्यात घडलेल्या घरफोड्या संदर्भाने तपास करण्यात येत होता. तेंव्हा लातूर जिल्ह्यातील तसेच लातूर जिल्हालगत असलेल्या इतर जिल्ह्यातील गुन्हेगारांची माहिती काढण्यात येत होती. गुन्हेगारांची माहिती मिळवण्याकरिता बातमीदार नेमण्यात आले होते. त्यांच्या मार्फतीने मिळालेल्या माहितीचे तसेच तांत्रिक माहितीचे बारकाईने विश्लेषण करण्याचे काम सुरू होते. यादरम्यान गोपनीय बातमीदाराकडून विश्वासनीय व खात्रीलायक माहिती मिळाली की, लातूर शहरामध्ये विविध पोलीस ठाण्याचे हद्दीत घरपोडीचे गुन्हे करणारे संशयित आरोपी त्यांनी चोरलेल्या सोन्या चांदीच्या दागिन्यासह चार चाकी अल्टो कार मधून लातूर शहरात फिरत आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने दिनांक 19/07/2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नमूद आरोपींच्या शोधात लातूर शहरात रवाना करण्यात आले.

सदर पथक मळवटी रोड जवळील बुरहान नगर येथे पोहोचून गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीची खातरजमा करून लातूर जिल्ह्यातील घरफोडीच्या गुन्ह्यातील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार नामे 1) राम दगडू गर्गेवाड, 26 वर्ष, राहणार सिद्धेश्वर नगर पिंटू हॉटेलच्या पाठीमागे लातूर. 2) आकाश उर्फ भावड्या बाबुराव कांबळे वय 24 वर्ष राहणार सिद्धेश्वरनगर, मळवटी रोड,लातूर अश्या आरोपींना ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी त्यांचे आणखीन दोन साथिदारासह लातूर शहरातील विविध ठिकाणी घरफोडीचे गुन्हे करून सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केल्याचे कबूल केले तसेच लातूर शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या अभिलेखाची पडताळणी केली असता नमूद आरोपी त्यांनी संगणमत करून लातूर शहरातील पोलीस ठाणे एमआयडीसी, पोलीस ठाणे औसा, पोलीस ठाणे भादा, पोलीस ठाणे देवणी, हद्दीमध्ये घरफोडीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले असून नमूद घरफोडीच्या गुन्ह्यात चोरलेल्या सोन्या-चांदीच्या दागिने व गुन्ह्यात वापरलेले चार चाकी वाहन अल्टो कार असा एकूण 2 लाख 68 हजार 300 रुपयेचा मुद्देमाल नमूद आरोपींताकडून जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपींनी चाकूर उदगीर येथे चोऱ्या केल्याचे कबूल केले आहे यावरून अधिक चे काही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.

फरार आरोपी क्रमांक 3 व 4 यांचा शोध स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घेत असून पुढील तपास एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी करीत आहेत सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखा लातूर येथील सहाय्यक फौजदार संजय भोसले, पोलीस अंमलदार सुधीर कोळसुरे, सिद्धेश्वर जाधव, प्रकाश भोसले, रामहरी भोसले, योगेश गायकवाड, मनोज खोसे, राहुल कांबळे यांनी बजावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!