डाॅ अण्णाभाऊ साठे जयंती व ताजिया मोहरम निमित्त शांतता बैठक संपन्न.
जयंती एक दिवस साजरी न करता ति आठवडाभर साजरी करा- अप्पर पोलीस अधीक्षक डाॅ अजय देवरे
लातूर दि 25 जुलै 29 जुलै रोजी साजरा होणारा ताजिया मोहरम आणि 01 ऑगस्ट रोजी संपन्न होणारे डाॅ अण्णाभाऊ साठे जयंती उस्तवानिमित्त लातूर पोलीसांच्या वतिने आयोजित पोलीस अधीक्षक कार्यालयात शांतता बैठक संपन्न झाली. या बैठकीत मातंग समाजाच्या वतिने विविध मागण्या करण्यात आल्या त्या मागण्यांबाबत विचार करत काही मागण्या पोलीस प्रशासनाच्या अधिकारात बसत नाही सांगत शासनाच्या आदेशाचे पालन करण्यात यावे असे सुचित करण्यात आले तर काही ठिकाणी सुट देण्यात आली आहे. मोहरम सणात आतापर्यंत काही अडचणी आल्या नसल्या बाबत त्या डोला धारकांचे अभिनंदन पोलीसांकडून करण्यात आले.

अप्पर पोलीस अधीक्षक श्री अजय देवरे बैठकीत बोलताना म्हणाले कि महापुरुषांच्या मिरवणूक काढताना त्या मार्गावर येणाऱ्या अडचणी मंडळाने स्वतः तपासून घ्याव्या व त्या प्रशासनाला कळवाव्या. जयंती उस्तव काळात आवश्यक तेथे वाहतुकीत बदल करण्यात येईल. मिरवणुकीत वापरणारी वाहने प्रादेशिक परिवहन कार्यालयातील नोंदणीकृत व चालक परवाना धारक असावा. जयंती साजरी करताना महापुरुषांचे विचार आमलात आणावे व जबरदस्तीने वर्गणी गोळा करु नये. जयंती एक दिवस साजरी न करता ति विविध उपक्रमाने आठवडाभर साजरी करावी अश्या सुचना करत लातूर पोलीस दलाकडून अण्णाभाऊंच्या विचारांच्या लेखनातील शंभर प्रती वाटणार असल्याचे सांगितले आहे. या बैठकीस अप्पर पोलीस अधीक्षक डाॅ श्री अजय देवरे, शहर डि वाय एस पी श्री भागवत फुंदे विविध पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व अधिकारी श्री सुधाकर बावकर, श्री प्रेमप्रकाश माकोडे, डाॅ श्री विशाल शहाने हे उपस्थित होते तर बैठकीचे सुञ संचलन श्री दिवे यांनी केले.

यावेळी मातंग समाजातील संत गोरोबा सोसायटी चेअरमन तथा काँग्रेस प्रभाग क्रमांक तीन चे अध्यक्ष श्री विकास कांबळे, 103 व्या सार्वजनिक जयंती उस्तव समितीचे अध्यक्ष संदेश शिंदे, माजी नगरसेवक जि ए गायकवाड, कुचेकर, राहुल क्षीरसागर, राज क्षीरसागर, नुतन हणमंते, पंकज शिंदे व विविध मंडळाचे अध्यक्षांसह पदाधिकारी व ताजिया मोहरम चे डोला प्रमुख उपस्थित होते.