सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार करुन केशवराज शाळेत शिक्षक दिन साजरा.
लातूर दि 05 सप्टेंबर लातूर येथील श्री केशवराज प्राथमिक विद्यालयात परिसरातील सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार करुन शिक्षक दिन साजरा करण्यात आला आहे. यावेळी मंचावर उपस्थित कार्यक्रमाच्या अध्यक्षा मा .सौ.वर्षाताई डोईफोडे शिशु वाटिका शालेय समिती अध्यक्षा, प्रमुख अतिथी मा.श्री उद्धव ढगे,सौ. सुलभा देशपांडे निवृत्त शिक्षिका, मा.सौ.योगिनीताई खरे शालेय समिती अध्यक्षा, आदर्श शिक्षिका सौ.मनीषा सौदागर, मुख्याध्यापक श्री शिवाजी हेंडगे हे उपस्थित होते. परिसरातील सेवानिवृत्त शिक्षक शारदा ठाकूर, मंगल बनसोडे, शैला भोसले, वर्षा देशपांडे, कुसूम बरडे, लिंबराज सोळुंके, शेषेराव बिराजदार, बालाजी संगनाळे, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त वर्षा डोईफोडे, उध्दव ढगे, सुलभा देशपांडे आणि विद्यालयातील यावर्षी निवडलेल्या आदर्श शिक्षिका मनिषा सौदागर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. हा सन्मान माझा एकट्याचा नाही तर सर्व सहकाऱ्यांचा आहे. सर्वांचे सहकार्य आणि मार्गदर्शन मला सतत मिळाले तसेच सर्वजण परिपूर्ण असू शकत नाहीत पण परिपूर्ण होण्यासाठीचा ध्यास आवश्यक असतो असे प्रतिपादन सत्कारमुर्ती मनिषा सौदागर यांनी केले. सुलभा देशपांडे, उध्दव ढगे यांनी ही यावेळी मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय समारोप करताना माननीय सौ. वर्षाताई डोईफोडे यांनी सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच सर्व शिक्षक ज्ञानदानाचे कार्य अविरतपणे करत असतात. त्यांच्या प्रती आदर व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. शिक्षकी पेशा हा व्यवसाय नसून ते एक व्रत आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात शिस्त आणि संस्कार देण्याचं काम शिक्षक करत असतात असे मत त्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री मुरलीधर गवळी यांनी केले. शिक्षक दिनाची माहिती सौ.संपदा देशपांडे यांनी सांगितली व कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ गवळण काजगुंडे यांनी केले. या कार्यक्रमाची सांगता शांती मंत्राने करण्यात आली.
