लातूर च्या पुर्व भागात पाणी पुरवठा एकच तास; मनपा आयुक्तांना दोन तास पाणी पुरवण्यासाठी निवेदन.
लातूर दि 19 सप्टेंबर लातूर शहरातील पुर्व भागात जलकुंभावरुन मानवी वस्तीत पुरवले जाणारे पिण्याचे पाणी चार तासावरुन थेट एक तासावर आल्यामुळे पाणी पुरवठा कमी झाले असल्याचे सांगत प्रभाग क्रमांक तीन चे काँग्रेस अध्यक्ष तथा संत गोरोबा सोसायटी चेअरमन विकास कांबळे यांनी आपल्या शिष्टमंडळासोबत मनपा आयुक्त श्री बाबासाहेब मनोहरे यांची भेट घेत हे पाणी पुरवठा एक तासाऐवजी दोन तास द्यावा अशी आशयाच्या मागणीचे निवेदन दिले आहे.
यावेळी ॲड राजेंद्र लोंढे, अशोक सूर्यवंशी, वैभव कांबळे, देविदास, अजय आडगळे, महादू गायकवाड, भगवान कांबळे, अजय सोमवंशी, पवन कांबळे, रोहित कांबळे, रवी मस्के, बादल जाधव, दत्ता इच्छे, आकाश पाटोळे, अजय कांबळे, अनिकेत कांबळे, अर्जुन बावरे, शफिक शेख, अलीम शेख, अमावस लोंढे, सोनू शिंदे, व प्रभागातील मधील सर्व युवक व नागरिक उपस्थित होते.