गांधी चौक पोलीस ठाण्यात पोलीसाने डोक्यात रायफलची गोळी झाडून घेतली.
घटनेने सर्वञ एकच खळबळ; प्रकृती गंभीर; उपचार सुरु.
लातूर दि 23 सप्टेंबर गांधी चौक पोलीस ठाण्यात स्वामी विवेकानंद पोलीस ठाण्याच्या पोलीस कोठडी रक्षकाने स्वतःवरच एस एल आर रायफलने डोक्यात गोळी झाडून घेतली आहे. या घटनेने पोलीस खात्यात मोठा गोंधळ उडाला असुन तात्काळ पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. स्वामी विवेकानंद पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री पांडुरंग पिटले वय अंदाजे 50 वर्ष यांनी गांधी चौक पोलीस ठाण्यात पोलीस कोठडी रक्षकाची सेवा देत असताना काल शुक्रवार दि 22 सप्टेंबर रोजी राञी दहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला असुन त्यांच्याकडे सुरक्षेच्या कारणास्तव प्रदान करण्यात आलेल्या एस एल आर रायफलने स्वतःवरच त्यांनी गोळी झाडून घेतली आहे. त्यांची प्रकृती अस्थिर झाल्याने तात्काळ विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले आहे.
त्यांनी तणावाखाली हे उचललेले पाऊल अतिशय चिंताजनक असुन असे करण्यामागे काय कारण आहे हे अद्याप स्पष्ट नाही. त्यांची प्रकृती अतिशय गंभीर असुन ते लातूरच्या खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या कुटुंबीयांकडून एक शस्ञक्रिया यशस्वी पुर्ण झाली असुन थोड्याच वेळात दुसरी शस्ञक्रिया करण्यात येत असल्याचे समजते.