लातूर नेता न्यूज चा दणका धाराशिव जिल्हातील लोहारा तालुक्यात पोलीसांनी केली कारवाईला सुरुवात.
लोहारा दि २९ सप्टेंबर लोहारा तालुक्यातील भातागळी येथे तिरट नावाचा जुगार खेळणाऱ्या विरूध्द पोलिसांनी कारवाई करीत चौघाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. भातागळी येथील सत्यवान महादेव जगताप यांच्या मोकळ्या गाळ्यामध्ये तिरट नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या अधारे २८ सप्टेंबर रोजी लोहारा पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा मारला. यावेळी सजंय सुरेश फत्तेपुरे, (वय ४२) बाळासाहेब श्रीनिवास जगताप (वय ५५) सत्यवान महादेव जगताप (वय ५२ सर्व रा. भातागळी) मधुकर महादेव टेकाळे, (वय ६० रा. लातूर) हे सत्यवान महादेव जगताप यांच्या मोकळ्या गाळ्यामध्ये तिरट नावाचा जुगार खेळत व खेळवित असताना मिळून आले. जुगार साहित्यासह एकूण एक हजार २०० रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून आरोपीविरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- १२ (अ) अन्वये लोहारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.