मराठा समाजाला तत्काळ आरक्षण देवून राज्यात शांतता व सुव्यवस्था निर्माण करा- लातूरच्या पत्रकारांचे जिल्हाधिकार्‍यांमार्फत राज्यपालांना निवेदन.मराठा समाजाला तत्काळ आरक्षण देवून राज्यात शांतता व सुव्यवस्था निर्माण करा- लातूरच्या पत्रकारांचे जिल्हाधिकार्‍यांमार्फत राज्यपालांना निवेदन.

मराठा समाजाला तत्काळ आरक्षण देवून राज्यात शांतता व सुव्यवस्था निर्माण करा- लातूरच्या पत्रकारांचे जिल्हाधिकार्‍यांमार्फत राज्यपालांना निवेदन.

लातूर – मराठा समाज विविध आंदोलनांच्या माध्यमातून करीत असलेली मराठा आरक्षणाची मागणी तात्काळ मान्य करून महाराष्ट्रात शांतता व सुव्यवस्था निर्माण करावी, या आशयाचे निवेदन लातूरच्या पत्रकारांनी आज 31 ऑक्टोबर रोजी लातूरच्या जिल्हाधिकार्‍यांमार्फत महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे यांना दिले आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात समग्र मराठा समाज गावागावात सनदशीर मार्गाने आमरण उपोषण, रास्ता रोको असे विविध माघ्यमातून आंदोलने करीत आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाची मागणी गांभीर्याने घेवून राज्यपाल रमेश बैस व मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी तत्काळ मान्य करावी आणि राज्यात शांतता आणि सुव्यवस्था निर्माण करावी. अशी मागणी लातूरच्या पत्रकारांनी सदर निवेदनात केली आहे. सदरचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांना देण्यात आले. निवेदन देणार्‍या शिष्टमंडळात ज्येष्ठ पत्रकार रघुनाथ बनसोडे, लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरसिंह घोणे, हरिश्‍चंद्र जाधव, शिवाजी कांबळे, लिंबराज पन्हाळकर, अमरजित बनसोडे, मासूम खान आदी पत्रकारांचा समावेश होतो. राज्यपालांना पाठवलेल्या निवेदनावर पत्रकार रघुनाथ बनसोडे, नरसिहं घोणे, महेंद्रकुमार जोंधळे, हरिश्‍चंद्र जाधव, शिवाजी कांबळे, लिंबराज पन्हाळकर, अमरजित बनसोडे, मासूम खान, अमोल इंगळे, रवि बिजलवाड, विष्णू आष्टेकर, लहुजी शिंदे आदींसह इतर पत्रकारांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!