औसा तालुक्यातील गोंद्री येथे आणखी एका तरुणाची मराठा आरक्षणासाठी गळफास घेऊन आत्महत्या.
औसा प्रतिनिधी : औसा तालुक्यातील गोंद्री येथे तरुणाने मराठा आरक्षणासाठी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आज दि 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 ते 9 वाजण्याच्या सुमारास स्वतःच्या शेतातच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली असुन या युवकाचे नाव शरद वसंत भोसले असे आहे. सरकार मराठ्याला आरक्षण का देत नाही अश्या आशयाची चिठ्ठी लिहुन त्याने स्वतःची जिवनयाञा संपविल्याचे समजते. शरदचे वय अवघे 36 वर्ष असुन त्याच्या पश्चात पत्नी कोमलबाई शरद भोसले वय वर्ष 25 आणि त्यांना दोन मुली एक अश्विनी शरद भोसले वय वर्ष 7 दुसरी राणी शरद भोसले वय वर्ष 5 व आई वडील भाऊ असा परिवार आहे.
राज्यात मराठा आरक्षणासाठी आत्महत्येचे प्रमाण वाढत असून सरकारने तातडीचे ठोस पावले उचलुन मराठा आरक्षणावर निर्णय घ्यावे अशी मागणी मराठा समाजातून होत आहे. दरम्यान या युवकाचे मृतदेह गोंद्री गावात आणुन मराठा समाजाने आंदोलन सुरु केल्याचेही समजते.