ऊसतोड कामगारांना फराळाचे वाटप करत कै.आनंदा सूर्यवंशी चॅरिटेबल ट्रस्टने केली दिवाळी साजरी.
लोणंद प्रतिनिधी : देशात सर्वांचीच दिवाळी गोड होण्याकरिता राबणारे हात म्हणजे ऊसतोडणी कामगार पण मैलो नी मैलो लांब आलेल्या कुटुंबांना कसली आलीय दिवाळी. ऐण सणासुदीच्या काळात ऊसतोडीसाठी आलेल्या ऊसतोड कामगार दिवाळी सणापासून वंचित राहू नये यासाठी कै.आनंदा सुर्यवंशी चॅरिटेबल ट्रस्ट पाडेगाव व मांगल्य शिक्षण प्रसारक संस्था पुणे 28 यांच्या वतीने पुरंदर, खंडाळा व फलटण तालुक्यातील ऊसतोड कामगारांच्या पालावर व तळावर जाऊन लाडू, करंजी, चिवडा, चकली आदी पदार्थांचे ट्रस्टच्या उपाध्यक्षा श्रीमंती विमल सुर्यवंशी यांनी व इतर महिलांच्या मदतीने बनवून 450 पॅकिंग पाकिटे शेकडो कुटुंबांना वाटप करण्यात आले असल्याचे ट्रस्टच्या वतिने सांगण्यात आले आहे.

दिवाळीच्या पहिल्या दिवस वसुबारस व धनत्रयोदशी या दिवशी पाडेगाव फार्म, सालपे, चव्हाणवाडी ता.फलटण व बाळूपाटलाचीवाडी, खेड ता. खंडाळा आणि पिंपरे ता. पुरंदर या ठिकाणी उतरलेल्या तळावर जाऊन फराळाचे वाटप श्री पवन सुर्यवंशी, श्री तानाजी खुडे, श्री विलास सुर्यवंशी व श्री सुनील भोसिकार यांनी केले. यावेळी चव्हाणवाडी येथील टोळीचे व्यवस्थापक श्री सतीश शिंदे, चिटबॉय श्री हेमंत निंबाळकर, सालपे येथील टोळीचे व्यवस्थापाक श्री दिपक शिंदे हे उपस्थित होते. संस्था व ट्रस्ट यांनी मागील 4 वर्षांपासून फराळाचे वाटप करण्याचा उपक्रम सुरू केला असून या वर्षी 450 ऊसतोड कामगारांच्या मुले व कुटुंबियांना मदतीचा थोडासा हात देऊन त्यांची दिवाळी गोड व्हावी या उद्देशातून फराळाचे वाटप करण्यात असल्याचे समजते.
