लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या विविध योजनेच्या प्रचारासाठी लातूरात मातंग रोजगार मेळावा.
लातूर दि 18 नोव्हेंबर लातूर व बिड जिल्ह्यातील मातंग समाजातील बारा पोट जातींना साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळामार्फत राबविण्यात येणारा विविध योजना व नव्याने सुरु करण्यात आलेल्या किसान योजना व उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजनेची माहिती व्हावी या अनुशंगाने लातूरात मातंग समाज रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शासनाच्या नविन धोरणानुसार मातंग समाज व बारा पोटजातींचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी या योजना अण्णाभाऊ साठे महामंडळामार्फत राबविल्या जात असुन नविन अर्थ नियोजनात भरगोस फायदा मातंग समाजाला होणार असल्याचे महामंडळाचे लातूर जिल्हा व्यवस्थापक रमेश दरबस्तवार यांनी दिलेल्या प्रसिद्धी पञकात म्हटले आहे.
या मेळाव्यासाठी साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे मा. श्री मनिष सांगळे व्यवस्थापकीय संचालक व मा श्री अनिल म्हस्के महाव्यवस्थापक आणि मा श्री सुनिल वारे महासंचालक डॉ बाबासाहेब आबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे हे उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्याचे आयोजन लातूर शहरातील डॉ बाबासाहेब आंबडेकर सामाजिक न्याय भवन शिवनेरी गेट क्र.०१ समोर डाल्डा फॅक्टरी कंपाउंड लातुर येथील सभागृहात सकाळी आकरा वाजता आयोजन करण्यात आले असुन यासाठी मातंग समाजाने मोठ्या संख्येवर उपस्थित राहण्याचे आवाहन महामंडळाचे लातूर जिल्हा व्यवस्थापक रमेश दरबस्तवार यांनी केले आहे.