टिपु सुलतान जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे विकास कांबळे यांच्या हस्ते उद्घाटन.
लातूर दि 19 नोव्हेंबर शहरातील प्रभाग क्रमांक तीन येथील बालाजी नगर भागात शेर-ए-हिंद हजरत टिपु सुलतान यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक जयंती उस्तव समितीच्या वतिने आयोजित रक्तदान शिबिराचे काल दि 18 नोव्हेंबर रोजी आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्रभाग क्रमांक तीन चे अध्यक्ष तथा संत गोरोबा सोसायटी चेअरमन विकास कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. या उद्घाटन प्रसंगी विकास कांबळे यांचा मराठी भाषेत अनुवादित असलेला कुराण भेट देऊन सत्कार करण्यात आला आहे.
या उद्घाटन प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते लारा शेख, राज गोजमगुंडे, सय्यद इब्राहिम, शेख ताज, ॲड आनंद सोनवणे, साहिल शेख, इर्शाद सय्यद, गुड्डू खान, जाकिर पठाण, अवेज हमदुले, मोईन शेख यांच्यासह मोठ्या संख्येवर रक्तदाते समाज बांधव व सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.