एमडीए स्कुल ऑफ फार्मसी च्या खेळाडुंचे विभागीय टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश.
लातूर दि 22 नोव्हेंबर डाॅ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे अंतर्गत सोलापूर विभागीय टेबल टेनिस स्पर्धा नांदेड येथील ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॅम्पस महाविद्यालय येथे दि 20 नोव्हेंबर रोजी पार पडल्या.

टेबल टेनिस स्पर्धेत एमडीए स्कुल ऑफ फार्मसी कोळपा विभागा तर्फे मुलींमधून चेवले श्रुती, फातेमा शेख,आलापुरे ऋतुजा, मुस्कान शेख, सोनकांबळे उत्कर्षा या विद्यार्थीनींनी सहभाग नोंदवत खेळामध्ये अतुलनीय प्रदर्शन करुन उपविजेता पद प्राप्त केले आहे तर मुलांमधून बिरादार आदित्य, सोनटक्के गणपत, दिवाण चैतन्य, समशेट्टे परमेश्वर, इंगोले आशिष या विध्यार्थ्यांनीही खेळामध्ये अतुलनीय प्रदर्शन दाखवत उपविजेता पद प्राप्त करत महाविद्यालयाचा सन्मान वाढवला. या यशाबद्दल संस्थेचे संचालक श्री दिनेश अंबेकर, श्री यशवंत अंबेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य श्री रवि कुऱ्हाडे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी आदींनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.