संविधान दिनानिमित्त उदगीर येथे भिम आर्मी भारत एकता मिशन चे संविधान उद्देशिका वाचन.
26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहिद विरांना मानवंदना.
उदगीर दि 27 नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त उदगीर येथे संविधान प्रस्ताविका व उद्देशिकेचे सामुहिक वाचण करुन त्याचे वाटप करण्यात आले आहे तर 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहिद विरांना मानवंदना अर्पण करण्यात आली असल्याचे भिम आर्मी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय धावारे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पञकात म्हटले आहे.

या कार्यक्रमात संविधान उद्देशिकिचे वाटप नगर पालिका सदस्य तथा माजी बांधकाम सभापती गजानन साताळकर व माजी समाज कल्याण सभापती तथा संचालक बाजार समिती मधुकरराव एकुरकेकर यांच्या हस्ते करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भीम आर्मी चे महाराष्ट्र प्रदेश संघटक अक्षय धावारे, मराठवाडा संघटक मिलींद ढगे, जिल्हा अध्यक्ष विलास चक्रे, जिल्हा सचिव बबलू शिंदे व किशोर कसबे, चंद्रकांत शिंदे, धनाजी बनसोडे, दयानंद शिंदे, नितिन एकुर्केकर यांची उपस्थिती होती.

या कार्यक्रमाचे आयोजन व यशस्वीतेसाठी भिम आर्मी उदगीर तालुका अध्यक्ष आकाश कस्तुरे, आयोजक शहराध्यक्ष राहुल कांबळे, आर पी आय सुशील कुमार शिंदे, नरेंद्र उजेडकर, ऑल इंडिया पॅंथर सेनेचे प्रीतम सूर्यवंशी, पैलवान दत्ता कांबळे, पप्पू कांबळे, प्रदीप कांबळे, मुक्तदिर देवणीकर, पप्पू सोमवंशी, विजय भालेराव, रामदादा शिंदे, अरुण उजेडकर, प्रदीप सावरे, समीर शेख बाळू फड गौस शेख धम्मा सुतार, प्रदीप कांबळे, सिद्धार्थ कांबळे, राम काळे, मेहबूब शेख, आकाश गायकवाड, आकाश माने, सुरेश वाघमारे यांनी प्रयत्न केले तर यावेळी भिम आर्मी भारत एकता मिशन चे शेकडो कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते.
