राज्यस्तरीय श्री अनंतपाळ मराठी ग्रामीण कवी संमेलनाचे माने यांच्या हस्ते उद्घाटन.
शिरुर अनंतपाळ दि 27 नोव्हेंबर ग्रामीण भागातील लेखकांना व्यासपीठ मिळावे या प्रामाणिक भावनेतून शिरूर अनंतपाळ येथे जेष्ठ कवी साहित्यिक गोविंद श्रिमंगल व कवयिञी सरोजाताई गायकवाड आयोजित राज्यस्तरीय श्री अनंतपाळ मराठी ग्रामीण कवी संमेलनाचे ठाकरे शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष शिवाजी माने यांच्या हस्ते काल दि 26 नोव्हेंबर रोजी शिरुर अनंतपाळ येथे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला शहरातून ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. हि ग्रंथ दिंडीला मोठा प्रतिसाद होता. संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते “गंगेच्या धारा’ लेखिका सौ मंगला शेटे व लेखक संदेश बिराजदार, “दैवत’ लेखिका योगेश्वरी डुकरे, तसेच “आतला आवाज’ लेखक शिवसिंग भाऊलाल डोंगरजाळ यांच्या या पुस्तकांचे प्रकाशनही करण्यात आले.
याप्रसंगी व्यासपीठावर हेर विधानसभेचे माजी आमदार रामभाऊ गुंडीले, प्रभाकर कुलकर्णी, एन बी आवांळे, अजित माने, डॉक्टर अरविंद भातंब्रे, शिरूर अनंतपाळ नगरपंचायतीच्या उपाध्यक्षा सुषमाताई मठपती, संमेलनाचे स्वागत अध्यक्ष विधीज्ञ रमेश अण्णा उंबरगे, सोमनाथ रोडे, सरपंच डोंगरे, तहसिलदार काशिनाथ पाटील, पीएसआय दराडे, रवी भाऊ बेलापत्रे मुंबई, अनिल बिडवे, बसवराज मठपती, माजी कृषी सभापती गोविंदराव चिलकुरे, भागवत वंगे, बाबुराव शेळके, सतीश शिवने, बाळासाहेब दंडीमे, सोमनाथ स्वामी यांची उपस्थिती होती तर या संमेलनासाठी राज्यातून ग्रामीण भागातील आलेले साहित्यिक कवी यांची मोठ्या संख्येवर उपस्थिती होती.