छ शिवाजी नगर पोलीसांनी मंगळसुञ चोरांच्या टोळीवर कारवाई करत 5लाख29हजाराचा केला मुद्देमाल जप्त.
लातूर दि 01 डिसेंबर छ शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजीव गांधी चौकातून दि 24 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी आठ ते नऊ वाडण्याच्या दरम्यान फिर्यादी महीला भाजीपाला खरेदी करुन पाई चालत घराकडे जात असताना अनोळखी २५ ते ३० वयोगटातील मोटार सायकलवरील दोन इसमांनी फिर्यादी महीलेच्या गळ्यातील मिनीगंठण हिसकावुन १६ ग्रॅम वजनाचे मिनीगंठण किंमत ५०,०००/-रु.चा माल मोटार सायकलवर पळुन गेले वरुन पोस्टे शिवाजी नगर लातुर गुरन ५८१/२०२३ कलम ३९२, ३४ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी लातूर शहर व पोलीस निरीक्षक शिवाजी नगर यांनी लातूर शहरातील गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलिस अंमलदार यांना घटनास्थळी बोलावून सदरचा गून्हा उघडकीस आणण्याचे आदेश देवुन पथक तयार करून लातूर शहरात रवाना केले होते.
त्या अनुशंगाने सदर पथकातील पोलिस अमलदार यांनी तांत्रीक गुप्तबातमीदारा मार्फत अज्ञात गुन्हेगाराचा व गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकलचा शोध घेवुन मिळलेल्या माहीतीवरून दि 26 नोव्हेंबर 2023 रोजी आरोपी नामे सुशिल सुनिल नाथभजन वय 19 वर्ष राहणार राजे शिवाजी नगर लातुर यास सदर गुन्हयात वापरलेली मोटार सायकल होन्डा शाईन क्रमांक एम एच 24 व्हि यु 0698 सह जुनी रेल्वे लाईन रोडवर असलेल्या आयोध्या पान स्टॉल समोर अचानक पकडुन त्यास विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा मी व माझा साथीदार विधीसंघर्षग्रस्त बालक- असे आकाश ऊर्फ महेश रमेश टेळे यांचे सांगण्यावरुन दोघांनी लातूर शहरातील मोटार सायकली चोरुन आणुन चोरलेल्या मोटार सायकली व महीलांचे गळयातील सोन्याचे गंठण हिसकावुन आकाश टेळे याचे कडे देत होतो त्याबदल्यात मला व माझा साथीदार आकाश टेळे हा खाऊ घालणे, सुपारी, कपडे घेवून आम्हा दोघाचा गुन्हे करण्यासाठी वापर करीत होता. आम्ही दोघानी लातूर शहरातून चार मोटार सायकली चोरुन लातूर शहरातील अनखीन दोन महीलांचे गळ्यातील दोन गंठण हिसकावून चोरी केल्याचे सांगितल्याने त्यास अटक करुन त्याचेकडुन एक मोटार सायकल हस्तगत करण्यात आली आहे. त्यानंतर सदर पथकातील अंमदार यांनी पुणे, चौफुला, हडपसर, टेभुर्णी, निलंगा, लातूर शहर येथे शोध घेवून आरोपी नामे आकाश ऊर्फ महेश रमेश टेळे वय २५ वर्ष रा. राजे शिवाजी नगर लातुर यास पीव्हीआर चौक लातुर येथे ताब्यात घेवून त्याचेकडुन चार मोटार सायकली, किंमत ३,२५,०००/- अंदाजे व वरील गुन्ह्यातील मिनीगंठण व पोस्टे एमआयडीसी येथील एका गुन्ह्यातील गेला मुझेमाल सोन्याचे गंठण असे एकुन ३४ ग्रॅम वजनाचे दोन मिनीगंठण किंमत २,०४०००/- रु असा एकुन ५,२९,०००/- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे यातील आरोपी नामे आकाश ऊर्फ महेश रमेश टेळे वय २५ वर्ष रा. राजे शिवाजी नगर लातुर याने आरोपी नामे सुशिल सुनिल नाथभजन व त्याचा साथीदार विधीसंघर्षग्रस्त बालक यांचा सोबत कट रचुन त्याचा वापर करुन लातुर शहरातील पोस्टे शिवाजी नगर, लातुर व एमआयडीसी लातुर हवीत गंठण हिसकावून चोरी व मोटार सायकल चोरीचे गुन्हे केले आहेत आकाश टेळे हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार आसुन अधिक सखोल चौकशी चालु आहे.
सदरची कामगीरी ही मा.पोलिस अधीक्षक श्री. सोमय मुंडे, मा. अपर पोलिस अधिक्षक श्री. अजय देवरे मा. उपविभागीय पोलिस अधिकारी लातुर शहर श्री. भागवत फुंदे, मा. पोनि, शिवाजी नगर श्री. दिलीप सागर, मा. पोनि.पोस्टे विवेकानंद चौक श्री. सुधाकर बावकर मा. पोनि. एमआयडीसी श्री. गोरख दिवे यांचे मार्गदर्शनाखाली सपो. रामचंद्र ढगे, भिमराव बेल्लाळे, पोह/युवराज गिरी, संजय कांबळे, महेश पारडे गोविंद चामे, अभिमन्यु सोनटके, बालाजी कोतवाड, पोना बळवंत भोसले, प्रशांत ओगले, विनोद चलवाड पोकॉ काकासाहेब बोचरे अमित लहाने यांनी कामगीरी बजावली आहे सदर गुन्हयाचा तपास पोउपनि श्री. पोगुलवार व पोना धैर्यशील मुळे हे करीत आहेत..